मित्रांनो,
Troika भावनेवर आमचा पूर्ण विश्वास आहे.
ब्राझीलला आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली जी –20 आपली सामायिक उद्दिष्टे पुढे नेईल.
मी ब्राझीलचे राष्ट्रपती आणि माझे मित्र लूला-डी-सिल्वा यांना हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि मी त्यांच्याकडे अध्यक्षपदाची निर्णयहतोडी सोपवतो.
मी राष्ट्रपति लूला यांना याप्रसंगी आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो.
महामहीम,
जसे आपण सर्व जाणता, भारताकडे नोव्हेंबर पर्यंत जी –20 अध्यक्षतेची जबाबदारी आहे. अजून अडीच महिने शिल्लक आहेत.
या दोन दिवसांमध्ये तुम्ही सर्वांनी आपली मते इथे मांडली , सूचना केल्या, बरेच प्रस्ताव मांडले आहेत.
ज्या सूचना आल्या आहेत त्या पुन्हा एकदा तपासून त्यांच्या प्रगतीत पुन्हा गती कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करणे ही आता आमची जबाबदारी आहे. .
आपण नोव्हेंबर अखेर जी –20 शिखर परिषदेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे आणखी एक सत्र ठेवावे असा माझा प्रस्ताव आहे.
त्या सत्रात आपण या शिखर परिषदेदरम्यान मांडलेल्या मुद्द्यांचा आढावा घेऊ शकतो.
या सगळ्याची माहिती आमची टीम तुम्हा सर्वांसमोर सामायिक करेल.
तुम्ही सर्वजण यात सहभागी व्हाल अशी मी आशा करतो.
महामहीम,
याचबरोबर, मी ही जी –20 शिखर परिषद संपल्याची घोषणा करतो.
एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यचा मार्ग सुखद असेल.
स्वस्ति अस्तु विश्वस्य!
म्हणजे संपूर्ण जगात आशाआणि शांतता नांदो.
140 कोटी भारतीयांच्या या मंगलमय शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार.
***
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Sharing my remarks at the closing ceremony of the G20 Summit. https://t.co/WKYINiXe3U
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2023