Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिल्ली मेट्रो प्रवासी संख्येन कोविड पूर्वीची संख्या पातळी ओलांडली असल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

आपल्या एका X वरील पोस्टमध्ये, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, हरदीप सिंग पुरी यांनी माहिती दिली की, दिल्ली मेट्रोमधील दैनंदिन प्रवासी संख्येने कोविड पूर्वीची प्रवासी (प्री-कोविड) संख्या पातळी ओलांडली आहे. 10 फेब्रुवारी 2020 मध्ये, दिल्ली मेट्रोमध्ये दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या 66,18,717 होती, तर 28 ऑगस्ट 2023 रोजी ती संख्या 68,16,252 पर्यंत वाढली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान आपल्या X वरील पोस्टमध्ये म्हणतात;

“आनंदाची बातमी आहे. आमचे सरकार आपल्या शहरी केंद्रांना आधुनिक आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी सतत कार्य करत राहील.”

***

Jaidevi PS/VPY/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai