Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स व्यापार मंच नेत्यांच्या संवादात पंतप्रधान सहभागी

ब्रिक्स व्यापार मंच नेत्यांच्या संवादात पंतप्रधान सहभागी


नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 22 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग इथे ब्रिक्स व्यापार मंच नेत्यांच्या संवादात सहभागी झाले.

ब्रिक्स व्यापार मंचाच्या चर्चेबद्दल नेत्यांना माहिती देण्यात आली.

सामाजिक-आर्थिक आव्हानांवर तंत्रज्ञान आधारित उपायांसह व्यापार सुलभता वाढवण्यासाठीभारताने हाती घेतलेल्या विविध सुधारणा पंतप्रधानांनी अधोरेखित केल्या. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी ब्रिक्स व्यापार क्षेत्रातल्या नेत्यांना आमंत्रित केले.

कोविडने लवचिक आणि सर्वसमावेशक पुरवठा साखळीचे महत्त्व अधोरेखित केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि यासाठी परस्पर विश्वास आणि पारदर्शकतेच्या महत्त्वावर भर दिला.

ब्रिक्स देश एकत्रितपणे जगाच्या, विशेषत: ग्लोबल साउथच्या कल्याणामध्ये महत्वाचे  योगदान देतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

 

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai