नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की निवृत्त सैनिकांसाठी (ईएसएम) सुधारित कल्याणकारी योजना लागू करण्याच्या केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे या सैनिकांचे जीवनमान सुधारेल.
देशाच्या सैन्यदलांतून निवृत्त झालेल्या सैनिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा हेतू आणि त्यांचे जीवन अधिक सुलभ करण्याचे धोरण यांना अनुसरुन, निवृत्त सैनिकांसाठीच्या कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
यावर प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे;
“सेवेत असताना आपल्या देशासाठी लढलेल्या शूर सेवानिवृत्तांचा भारताला अभिमान आहे. त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेल्या अधिक सुविधांसहित कल्याणकारी योजनांमुळे त्यांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुधारेल.”
India is proud of the valiant Ex-Servicemen who have defended our nation. The welfare schemes which have been enhanced for them will greatly improve their quality of life. https://t.co/vtGMVpbEGg
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2023
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai