पंतप्रधान, 22 जुलै 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता रोजगार मेळाव्यात सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये भरती केलेल्या 70,000 पेक्षा नवीन उमेदवारांना दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे वाटणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान उमेदवारांना संबोधित करतील.
देशभरात 44 ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत. केंद्र सरकारच्या विभागांबरोबरच या उपक्रमाला पाठिंबा देणारी राज्य सरकारे तसंच केंद्रशासित प्रदेश यांच्या नियुक्त्याचा यात समवेश आहे. देशभरातून निवडले गेलेले नवनियुक्त उमेदवार महसूल विभाग, आर्थिक सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल संसाधन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि गृह मंत्रालय, अशा विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त होतील.
रोजगार मेळावा हे रोजगार निर्मितीला सर्वाधिक प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. रोजगार मेळावा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि युवकांचे सक्षमीकरण करुन त्यांना राष्ट्रीय विकासात सामिल होण्याची संधी देईल अशी अपेक्षा आहे.
नवनियुक्त उमेदवार iGOT कर्मयोगी पोर्टलवरील कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाईन अभ्यासक्रमातून स्वतःला प्रशिक्षित करण्याची करु शकतील. या पोर्टलवर 580 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
***
Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai