Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेतील आघाडीच्या आरोग्यतज्ञांच्या गटाने पंतप्रधानांची घेतली भेट

अमेरिकेतील आघाडीच्या आरोग्यतज्ञांच्या गटाने पंतप्रधानांची घेतली भेट


नवी दिल्‍ली, 21 जून 2023

 

आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या अमेरिकन तज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज न्यूयॉर्क इथे भेट घेतली.

दर्जेदार आरोग्यसेवेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, एकात्मिक औषधांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि आरोग्यसेवा सज्जता यासह आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध बाबींवर पंतप्रधान आणि तज्ञांनी चर्चा केली.

या बैठकीत सहभागी झालेल्या तज्ञांची नावे आणि तपशील खालीलप्रमाणे आहेत:

  • डॉ. पीटर होटेझ, नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन, टेक्सासचे संस्थापक अधिष्ठाता
  • डॉ. सुनील ए. डेव्हिड, टेक्सास स्थित व्हायरो वॅक्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी
  • डॉ. स्टीफन क्लास्को, जनरल कॅटॅलिस्टचे सल्लागार
  • डॉ. लॉटन आर. बर्न्स, आरोग्य व्यवस्थापन  प्राध्यापक, व्हार्टन स्कूल, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ
  • डॉ. विवियन एस. ली, संस्थापक अध्यक्ष, वेरिली लाइफ सायन्सेस
  • नोबेल पारितोषिक विजेते डॉ पीटर एग्रे, चिकित्सक, आणि मोलेक्यूलर जीवशास्त्रज्ञ, जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिन.

 

* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai