Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

21 जून रोजी असलेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना करून दिली आठवण


नवी दिल्‍ली, 31 मे 2023 

 

21 जून रोजी असलेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आठवण करून दिली आहे. या दिनासाठी आपण सज्ज होऊया, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी ही प्राचीन परंपरा  साजरी करूया, असे आवाहन मोदी यांनी केले आहे.

आयुष मंत्रालयाच्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले;

“आंतरराष्ट्रीय योग दिनाला फक्त तीन आठवडे राहिले आहेत!

आपल्या मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्तीत वाढ करणारी ही प्राचीन परंपरा  साजरी करण्यासाठी आपण सज्ज होऊया. चला एक अधिक निरोगी आणि आनंदी समाज निर्माण करूया.”