पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथील जी –7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांची 20 मे 2023 रोजी भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमधील प्रगतीचा आढावा घेतला. उच्च स्तरीय आदानप्रदान करण्यावर आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातील बंध अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
संरक्षण, लवचिक पुरवठा साखळी तयार करणे, ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास, संस्कृती आणि लोकांशी लोकांचे स्नेहबंध अधिक दृढ करणे या क्षेत्रातील संधींवर देखील दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.
दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक घडामोडींवरही सकारात्मक विचार मंथन झाले. त्यांनी आसियान आणि भारत-प्रशांत क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा केली.
पंतप्रधानांनी व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन् यांना भारताच्या जी 20 अध्यक्षतेबद्दल माहिती दिली आणि ग्लोबल साऊथ क्षेत्राविषयीचा दृष्टिकोन आणि चिंता अधोरेखित करण्यासाठीच्या भारताच्या प्राधान्यक्रमांविषयी सांगितले.
***
Jaydevi PS/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Prime Ministers @narendramodi and Pham Minh Chinh held talks in Hiroshima. They discussed different aspects of India-Vietnam friendship, particularly in areas like energy, technology, commerce and defence. pic.twitter.com/9bsdWS1MHO
— PMO India (@PMOIndia) May 20, 2023