Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे केले अनावरण

पंतप्रधानांनी हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे केले अनावरण


पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2023 रोजी जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले.

जपानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार आणि संसद सदस्य नाकातानी जनरल, हिरोशिमा शहराचे महापौर काझुमी मात्सुई, हिरोशिमा सिटी असेंब्लीचे अध्यक्ष तात्सुनोरी मोटानी, हिरोशिमा येथील संसद सदस्य आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी;  भारतीय समुदायाचे सदस्य;  आणि जपानमधील महात्मा गांधींचे अनुयायी आदी मान्यवर अनावरण सोहळ्याला उपस्थित होते. 

पंतप्रधानांचा 19-21 मे 2023 दरम्यान जी-7 शिखर परिषदेसाठी जपान दौरा होत आहे. त्या निमित्ताने भारत आणि जपान यांच्यातील मैत्री आणि सद्भावनेचे प्रतीक म्हणून भारत सरकारने हिरोशिमा शहराला महात्मा गांधीजींचा हा अर्धाकृती पुतळा भेट दिला आहे.  

पद्मभूषण पुरस्कार विजेते राम वनजी सुतार यांनी हा 42 इंच उंच कांस्य पुतळा साकारला आहे. मोटोयासु नदीला लागून असलेल्या, प्रतिष्ठित ए-बॉम्ब डोमच्या जवळ आहे तो बसवला आहे. हजारो लोक – स्थानिक आणि पर्यटक येथे – दररोज भेट देत असतात.

शांतता आणि अहिंसेसाठी एकतेचे प्रतिक म्हणून या ठिकाणाची निवड केली आहे.  महात्मा गांधींनी आपले जीवन शांतता आणि अहिंसेला समर्पित केले.  हे स्थान खरोखरच गांधीजींच्या तत्त्वांशी आणि जीवनाचे प्रतिबिंब आहे. जगाला आणि त्यांच्या नेत्यांना ते सतत प्रेरणा देत आहे.

*****
 

Jaydevi/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai