पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काकीनाडा येथील नौदल जमिनीवरुन जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रं. 149 च्या मार्गात बदल करण्याला मंजूरी देण्यात आली. यासंदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
· काकीनाडा येथील नौदल जमिनीवरुन जाणाऱ्या सध्याच्या महामार्गाखाली असलेली आंध्र प्रदेश सरकारच्या मालकीची असलेली 11.25 एकर जमिन ताब्यात घेणे.
· काकीनाडा येथील नौदलाच्या मालकीची 5.23 एकर जमिन आंध्र प्रदेश सरकारला हस्तांतरीत करणे.
· आंध्र प्रदेश सरकारला जमिन ताब्यात घेण्यासाठी तसेच पर्यायी रस्ता उभारण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून 1882.775 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणे.
रस्त्याच्या मार्गात बदल केल्यामुळे अपघात कमी होतील, तसेच नौदल तळावरील सुरक्षेत वाढ होईल आणि जमिन व पाण्यावरील युध्दा बाबतचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्राच्या सुरक्षिततेही वाढ होईल.
B.Gokhale/J.Patanakar/Anagha