Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे पहिल्या सुपर सिरीजचे अजिंक्यपद पटकावल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन


चीन खुल्या सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जिंकलेल्या तिच्या पहिल्या सुपर सिरीज अजिंक्यपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

“पहिल्या सुपर सिरीज अजिंक्यपद पटकावल्याबद्दल पी. व्ही. सिंधूचे अभिनंदन. चीन खुल्या सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत तिने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले”, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha