Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आयआयटी मद्रास येथे ‘बंदरे, जलमार्ग आणि किनारे’ यांच्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान केंद्राच्या उद्घाटनाचे केले स्वागत


केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते चेन्नई, येथील आयआयटी एम (IIT M) डिस्कव्हरी कॅम्पस येथे बंदरे, जलमार्ग आणि किनारे (NTCWPC) संशोधनात उपयोगी ठरणाऱ्या राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन झाले.

आयआयटी चेन्नईमध्ये सागरमाला कार्यक्रमांतर्गत,  77 कोटी रुपये खर्चून या राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राची (NTCWPC) स्थापना करण्यात आली आहे. हे सर्वांसाठी आदर्श ठरेल असे केंद्र असून, वैज्ञानिक आधार, शिक्षण, स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावहारिक संशोधन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण याद्वारे  सागरी क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सहाय्यभूत ठरेल.

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :

“आयआयटी चेन्नई मधील  NTCWPC देशाच्या  सागरी क्षेत्राच्या वृद्धीला अधिक बळकट करेल.” 

***

S.Thakur/B.Sontakke/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai