नवी दिल्ली, 5 एप्रिल 2023
देशात्तील शहरी गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार वाढल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एका ट्विटमध्ये माहिती दिली की शहर गॅस वितरण नेटवर्कने सुलभ आणि परवडणारे इंधन पुरवण्यात मोठी प्रगती केली आहे. 2014 मध्ये शहर गॅस वितरण नेटवर्कमध्ये देशातील 66 जिल्हे सहभागी होते, 2023 मध्ये 630 जिल्ह्यांचा समावेश झाला आहे; देशभरातील घरगुती पीएनजी जोडण्यांची संख्या 2014 मधील केवळ 25.40 लाखांवरून आता 103.93 लाख जोडण्या अशी झाली आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“ही उल्लेखनीय आकडेवारी आहे. ही व्याप्ती वाढवण्यासाठी वर्षानुवर्षे ज्यांनी मेहनत केली , त्या सर्वांचे मी कौतुक करतो.”
These are good numbers. I appreciate all those who worked hard over the years to make this coverage happen. https://t.co/N95OClJtKY
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2023
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
These are good numbers. I appreciate all those who worked hard over the years to make this coverage happen. https://t.co/N95OClJtKY
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2023