नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल 2022 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी रुपे डेबिट कार्ड आणि कमी मूल्याच्या BHIM-UPI व्यवहारांना (व्यक्ती-ते-व्यापारी) प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनलाभ योजना मंजूर केली आहे.
ही प्रोत्साहन योजना भक्कम डिजिटल पेमेंट परिसंस्था तयार करण्यास तसेच RuPay डेबिट कार्ड आणि BHIM-UPI डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देईल. ‘सबका साथ, सबका विकास‘ या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, ही योजना UPI Lite आणि UPI 123PAY ला किफायतशीर आणि वापरकर्ता-अनुकूल डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स म्हणून प्रोत्साहन देईल आणि देशातील सर्व क्षेत्र आणि विभागांमध्ये डिजिटल पेमेंट अधिक सखोल करण्यास सक्षम करेल.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
India's strides in digital payments will be further strengthened by today's Cabinet decision regarding promotion of RuPay Debit Cards and BHIM-UPI transactions. https://t.co/IoBL59gDU8
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2023