Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘नाटू नाटू’ साठी सर्वोत्कृष्ट मूळ गीत या गटात गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या आरआरआरच्या चमूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023

 

‘नाटू  नाटू’ या गीताला सर्वोत्कृष्ट मूळ गीत यासाठीचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरआरआरच्या  चमूचे अभिनंदन केले आहे.

आरआरआर चित्रपटसमूहाने  सामायिक केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

एक अतिशय  उल्लेखनीय कामगिरी!  एम.एम. कीरावानी, प्रेमरक्षित, काल भैरव, चंद्रबोस, राहुल सिपलीगुंज या सर्वांचे अभिनंदन.  मी एस एस राजामौली, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि संपूर्ण आरआरआर चित्रपट चमूचेही अभिनंदन करतो. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे.

 

  N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai