Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी प्रदेशात भारत-चीन सीमेजवळ जवानांसह आणि जनतेसह दिवाळी साजरी केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी आज हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळच्या सुमडो गावाला भेट दिली.

त्यांनी भारत-तिब्बेट सीमा पोलीस आणि भारतीय लष्करातील जवानांशी संवाद साधला आणि त्यांना मिठाई वाटली.

जवानांशी संवाद साधताना ते म्हणाले कि २००१ सालापासून दरवर्षी ते दिवाळीत सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांना भेटायला जातात .

ते म्हणाले कि संदेश २सोल्जर्स अभियानाचा भाग म्हणून जवानांना संदेश पाठवण्याच्या त्यांच्या आवाहनाला देशभरातील जनतेकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

पंतप्रधान म्हणाले कि माजी सैनिकांना एक पद एक निवृत्तीवेतन देण्याबाबत त्यांनी जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले आणि ते पूर्ण करू शकलो याचा त्यांना आनंद आहे.

लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग यावेळी उपस्थित होते.

सुमडोहून परत येताना पंतप्रधान थोडा वेळ जवळच्या चांगो गावात थांबले. त्यांनी तेथील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या , त्यांच्याशी संवाद साधला आणि मुलांना मिठाई वाटली.