Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे एका सार्वजनिक सभेत झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2022 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील एका सार्वजनिक सभेत झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि अपघातातील जखमींना 50,000 रुपये मदतनिधीची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:

“आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे एका सार्वजनिक सभेत झालेल्या दुर्घटनेमुळे दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबीयां प्रति सहवेदना. जखमी लवकर बरे होवोत. प्रत्येक मृतांच्या वारसाला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल.  जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”

 

 

* * *

G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai