Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बाली येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली फ्रान्सच्या राष्ट्राध्‍यक्षांची भेट

बाली येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली फ्रान्सच्या राष्ट्राध्‍यक्षांची भेट


नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  फ्रान्सचे राष्‍ट्राध्‍यक्ष  इमान्युएल मॅक्रॉन यांची आज बाली येथे आयोजित G-20 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर भेट घेतली. उभय नेत्यांनी  भोजनप्रसंगी भेट घेतली.

दोन्ही नेत्यांनी संरक्षण, नागरी आण्विक, व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध क्षेत्रात सुरू असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला. आर्थिक गुंतवणुकीच्या नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ होत असल्याबद्दल  त्यांनी स्वागत केले.

प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही  परस्पर हिताच्या दृष्‍टीने दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

 

 

 

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai