पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे 10,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना, विप्लव विरुदु अल्लुरू सीतारामराजू यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आंध्र प्रदेशला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. व्यापार आणि व्यवसायाची अतिशय समृद्ध परंपरा असलेले विशाखापटणम हे एक विशेष शहर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. प्राचीन भारतामध्ये एक महत्त्वाचे बंदर असल्यामुळे विशाखापटणम हे हजारो वर्षांपूर्वी पश्चिम आशिया आणि रोमशी होणाऱ्या व्यापारासाठीच्या मार्गाचा एक भाग होते तसेच आजच्या काळात आणि या युगात भारताच्या व्यापाराचे हे मध्यवर्ती ठिकाण आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 10,500 कोटी रुपये खर्चाच्या ज्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होत आहे, ते प्रकल्प पायाभूत सुविधा, सुलभ जीवन आणि आत्मनिर्भर भारताचे नवे आयाम खुले करतील आणि विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेशच्या आशा आणि आकांक्षांच्या पूर्ततेचे एक माध्यम बनतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा पंतप्रधानांनी यावेळी विशेष उल्लेख केला आणि आंध्र प्रदेशसाठी त्यांचे प्रेम आणि समर्पित वृत्ती याला तोड नाही असे सांगितले.
शिक्षण असो वा उद्यमशीलता, तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात आंध्र प्रदेशच्या लोकांनी आपला ठसा उमटवला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांची ही ओळख केवळ त्यांच्या व्यावसायिक गुणवैशिष्ट्यांमुळे निर्माण झालेली नाही तर आंध्र प्रदेशच्या लोकांचा अतिशय हसतमुख स्वभाव आणि मित्रत्वाची भावना यामुळेही झालेली आहे, असे ते म्हणाले. लोकार्पण आणि पायाभरणी होत असलेल्या प्रकल्पांबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि या प्रकल्पांमुळे या राज्याच्या विकासाच्या गतीला चालना मिळेल, असे सांगितले.
या अमृत काळात आपला देश विकसित भारताच्या उद्देशाने विकासाच्या मार्गावर झपाट्याने पुढे जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विकासाचा मार्ग बहुआयामी असून सामान्य नागरिकांच्या आवश्यकता आणि मूलभूत गरजांवर तो भर देत आहे आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी एक आराखडा मांडत आहे, असे त्यांनी सांगितले. समावेशक विकासाचा सरकारचा दृष्टीकोनही त्यांनी अधोरेखित केला. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याच्या, यापूर्वीच्या सरकारांच्या दृष्टीकोनावर पंतप्रधानांनी टीका केली. त्यांच्या या वृत्तीमुळे लॉजिस्टिक्सच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि पुरवठा साखळीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली असे त्यांनी सांगितले. पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स मल्टीमोडल कनेक्टिविटीवर अवलंबून असल्यामुळे विकासाच्या एकात्मिक दृष्टीकोनावर भर देत असताना पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत एका नव्या दृष्टीकोनाचा अंगिकार सरकारने केल्याची माहिती त्यांनी दिली. आजच्या प्रकल्पांच्या माध्यमातून एकात्मिक विकासाचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी प्रस्तावित आर्थिक मार्गिका प्रकल्पामधील 6 पदरी मार्ग, बंदर जोडणीसाठी स्वतंत्र मार्ग, विशाखापटणम रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण आणि मासेमारीसाठी अत्याधुनिक बंदराची उभारणी या प्रकल्पांची माहिती दिली. पंतप्रधानांनी या एकात्मिक दृष्टीकोनाचे श्रेय पीएम गती शक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याला दिले आणि यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीला केवळ गती मिळाली नाही तर प्रकल्पांच्या खर्चातही कपात झाली आहे, असे सांगितले. मल्टी मोडल वाहतूक प्रणाली प्रत्येक शहराचे भविष्य आहे आणि विशाखापटणमने या दिशेने पुढचे पाऊल उचलले आहे, असे ते म्हणाले. आंध्र प्रदेश आणि त्याचा किनारपट्टीलगतचा भाग विकासाच्या शर्यतीत नवी चालना आणि उर्जेसह पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक हवामानात निर्माण होत असलेल्या समस्यांचा त्यांनी उल्लेख केला आणि महत्त्वाच्या उत्पादनांच्या पुरवठ्यात आणि उर्जाविषयक गरजांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांबाबत चिंता व्यक्त केली. मात्र, या खडतर कालखंडातही भारताने विकासाचा एक नवा अध्याय लिहिला, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या कामगिरीची तज्ञांकडून प्रशंसा होत असून त्याची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे आणि संपूर्ण जगासाठी भारत आशेचा एक किरण बनला आहे, असे त्यांनी सांगितले. भारत आपल्या नागरिकांच्या आशा आकांक्षाची पूर्तता करत काम करत असल्यामुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक धोरण आणि निर्णय सामान्य नागरिकाच्या कल्याणासाठी होत आहे. यावेळी पंतप्रधानांनी पीएलआय योजनेचा उल्लेख करत, जीएसटी, आयबीसी आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधांची मालिका यामुळे भारतातील गुंतवणुकीत वाढ झाली आहे, असे सांगितले. त्याचबरोबर गरिबांच्या कल्याणाच्या योजनांचा विस्तार केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. विकासाच्या या प्रवासात यापूर्वी जी क्षेत्र उपेक्षित होती त्यांचा देखील आज समावेश केला जातो आहे. अगदी सर्वात जास्त मागास जिल्ह्यांच्या विकासाच्या योजना देखील आकांक्षित जिल्हे कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गेली अडीच वर्षे लोकांना देण्यात येत असलेले मोफत रेशन, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दर वर्षी जमा होणारे सहा हजार रुपये, ड्रोन, गेमिंग आणि स्टार्ट अप संबंधित नियमांमध्ये उदारीकरण अशा अनेक पावलांची देखील पंतप्रधानांनी माहिती दिली.
Projects pertaining to connectivity, oil and gas sector being launched in Visakhapatnam, will give fillip to Andhra Pradesh’s growth. https://t.co/M3XmeKPDkn
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2022
The city of Visakhapatnam is very special, says PM @narendramodi. pic.twitter.com/WjfSrhmEFx
— PMO India (@PMOIndia) November 12, 2022
Be it education or entrepreneurship, technology or medical profession, people of Andhra Pradesh have made significant contributions in every field. pic.twitter.com/KsheJiE8D5
— PMO India (@PMOIndia) November 12, 2022
Our vision is of inclusive growth. pic.twitter.com/KHmXpkCGfZ
— PMO India (@PMOIndia) November 12, 2022
We have adopted an integrated approach for infrastructure development. pic.twitter.com/5uJCMUHypb
— PMO India (@PMOIndia) November 12, 2022
PM GatiShakti National Master Plan has accelerated pace of projects. pic.twitter.com/X94tkClGUf
— PMO India (@PMOIndia) November 12, 2022
Our policies and decisions are aimed at improving the quality of life for the countrymen. pic.twitter.com/RiOwkmSTyF
— PMO India (@PMOIndia) November 12, 2022
Today, the country is making efforts on a large scale to realise the infinite possibilities associated with Blue Economy. pic.twitter.com/4nBNxEo8yx
— PMO India (@PMOIndia) November 12, 2022
***
M.Pange/S.Patil/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Projects pertaining to connectivity, oil and gas sector being launched in Visakhapatnam, will give fillip to Andhra Pradesh's growth. https://t.co/M3XmeKPDkn