Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती हबचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

राष्ट्रीय अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती हबचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

राष्ट्रीय अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती हबचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

राष्ट्रीय अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती हबचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधील लुधियाना इथे राष्ट्रीय अनुसूचित जाती/अनुसूचिज माती हब आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाकरीता (एमएसएमई) शून्य वैगुण्य – शून्य परिणाम योजनेचा शुभारंभ केला. त्यांनी एमएसएमईना राष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान केले. मोदी यांनी महिलांना 500 लाकडी चरख्यांचे वाटप देखील केले.

याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, लुधियाना हे महत्त्वपूर्ण आर्थिक केंद्र आहे. आणि म्हणूनच एमएसएमईशी निगडीत योजनेचा शुभारंभ येथे करणे ही नैसर्गिक बाब आहे. भारताच्या आर्थिक विकासासाठी एमएसएमईने नियंत्रण मानकांच्या तोडीस काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

चरखे वितरणाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, खादी हे आपल्या अग्रक्रमी असायला पाहिजे आणि घरी जर चरखा असेल तर तो अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतो. खादीने बाजारपेठ उत्तम प्रकारे काबीज केली आहे, मोदी पुढे म्हणाले की, कोणे एके काळी “राष्ट्रासाठी खादी” हे घोषवाक्य होते जे आता बदलून “फॅशनसाठी खादी” असे झाले आहे.

दलितांमध्ये जर उद्योजकतेची भावना वृध्दिंगत झाली तर त्याचा लाभ आपल्याला होईल. देशात असा तरुण वर्ग आहे जे उद्योग आणि रोजगार निर्मितीची स्वप्ने बघतात.
याआधी पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे भेट देऊन, कोल्डम, पार्वती आणि रामपूर हे तीन जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha