Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉक्टर कलाम यांच्या सोबत गेली अनेक वर्ष खूप जवळून वावरता आल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो: पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 15 ऑक्‍टोबर 2022

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कलाम यांच्या सोबतच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मोदी स्टोरी या ट्विटर हँडल वरून डॉक्टर कलाम यांचे चुलत नातू यांनी डॉ.कलाम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि कलाम यांनी मागे सोडलेल्या वारशाचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केलेले प्रयत्न, याविषयीच्या आठवणी जागवल्या होत्या. या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणतात:

डॉक्टर कलाम यांच्या सोबत गेली अनेक वर्ष खूप जवळून वावरता आल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांची बुद्धिमत्ता, विनयशीलता आणि देशाच्या विकासाचा त्यांना असलेला ध्यास हे सर्व मी खूप जवळून अनुभवलं आहे.

* * *

S.Patil/A.Save/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai