नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय ‘पीएम पंतप्रधान शेतकरी सन्मान संमेलन 2022’ चे सकाळी 11.30 वाजता नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्था इथे उद्घाटन करतील.
या कार्यक्रमात देशभरातून 13,500 पेक्षा जास्त शेतकरी तसेच 1500 कृषी स्टार्टअप्स या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विविध संस्थांशी संबंधित 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत. या संमेलनात संशोधक, धोरणकर्ते आणि इतर हितसंबंधीय देखील सहभागी होणार आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते, रसायने आणि खते मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत, 600 पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांचे उद्घाटन होईल. देशातील खतांची किरकोळ विक्री करणारी दुकाने टप्प्याटप्प्याने पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रांत परिवर्तीत केली जातील. या केंद्रांतून शेतकऱ्यांच्या विविध गरजा भागवल्या जातील आणि शेतीला लागणारी सामुग्री (खते, बियाणे, उपकरणे), मृदा चाचणी सुविधा पुरवल्या जातील. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली जाईल, विविध सरकारी योजनांची माहिती दिली जाईल तसेच गट/जिल्हा स्तरावर असलेल्या खत दुकानदारांचा नियमित कौशल्यविकास केला जाईल. येत्या काळात 3.3 लाखांहून जास्त किरकोळ खत विक्री केंद्रे पंतप्रधान शेतकरी सन्मान केंद्रात रूपांतरित करण्याची योजना आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान ‘भारतीय सार्वजनिक खत प्रकल्प – एक देश एक खत’ योजनेचेही उद्घाटन करतील. या योजनेअंतर्गत पंतप्रधान भारत युरिया बॅग्सची सुरवात करतील. यामुळे ‘भारत’ या ब्रॅन्डनेमने कंपन्यांना आपल्या खतांचे विपणन करण्यात मदत मिळेल. शेतकरी कल्याणासाठी पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेचे प्रतिबिंब म्हणून या कार्यक्रमात पंतप्रधान, ‘प्रधानमंत्री थेट लाभ हस्तांतरण’ प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी सन्मान निधीचा 16,000 रुपयांचा 12 वा हप्ता जारी करतील. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकरी कुटुंबांना 2000 रुपयांचे तीन हप्ते असा वार्षिक 6000 रुपयांचा लाभ देण्यात येतो. आजपर्यंत, पात्र शेतकऱ्यांना पीएम – किसान योजनेअंतर्गत 2 लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांचा लाभ मिळाला आहे.
या प्रसंगी पंतप्रधान कृषी स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. जवळपास 300 स्टार्टअप्स अचूक शेती, कापणी नंतरची काळजी आणि मूल्यवर्धन उपाययोजना, कृषी संलग्न व्यवसाय, कचऱ्यातून संपत्ती, लहान शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण, पुरवठा साखळी व्यवस्थापन, कृषी लॉजिस्टिक व्यवस्था आणि आपले इतर नवोन्मेष या प्रदर्शनात मांडतील. या मंचावरून स्टार्टअप्स शेतकऱ्यांशी, शेती उत्पादन संस्था, कृषी तज्ञ, कॉर्पोरेट कंपन्या यांच्याशी संवाद साधू शकतील. तांत्रिक सत्रात स्टार्टअप्स आपले अनुभव सांगू शकतील आणि इतर हितसंबंधियांशी चर्चा करू शकतील.
या कार्यक्रमात, पंतप्रधान ‘इंडियन ईगल’ या खत विषयक ई – मासिकाचे प्रकाशन करतील. यातून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खते आणि या क्षेत्रातील इतर घडामोडींची माहिती मिळेल, इतर मुद्द्यांसोबतच अलीकडच्या घडामोडी, किंमत विषयक कल, उपलब्धता आणि वापर, शेतकऱ्यांच्या यशोगाथा याविषयी माहिती असेल.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai