Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हिमाचल प्रदेशात ऊना इथे औषधनिर्मिती, शिक्षण आणि दळणवळणाशी संबंधित प्रकल्पांच्या पायाभरणी तसेच लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

हिमाचल प्रदेशात ऊना इथे औषधनिर्मिती, शिक्षण आणि दळणवळणाशी संबंधित प्रकल्पांच्या पायाभरणी तसेच लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण


“भारत माता की – जय
भारत माता की – जय
भारत माता की – जय

होर भई ऊने आलियो! केमे हाल-चाल त्वाडा? ठीक-ठाक हो? मां चिंतपूर्णी, ते गुरू नानक देव जी, दे वंशजां दी, इश तरती नूँ, मेरा प्रणाम।

मित्रांनो, 

गुरु नानकजींचे स्मरण करत, गुरूंचे स्मरण करत, आज आई चिंतापूर्णीच्या चरणी नमन करत, धनत्रयोदशी आणि दीपावलीपूर्वी हिमाचलला हजारो कोटींची भेट देताना मला आनंद होत आहे. आज ऊना इथे, हिमाचल प्रदेशात दिवाळी वेळेच्या आधीच आली आहे. इथे इतक्या मोठ्या संख्येने देवी स्वरूप आपल्या माता-भगिनी आपल्याला आशीर्वाद द्यायला आल्या आहेत. आपणा सर्वांचे हे आशीर्वाद आमच्यासाठी एक फार मोठी ठेव आहे, फार मोठी शक्ती आहे. 

बंधू – भगिनींनो, 

मी इथे इतका मोठा काळ घालवला आहे, की जेव्हाही मी ऊनाला येतो, तेव्हा सगळया जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात. हे माझे सौभाग्य आहे की देवी आई चिंतापूर्णी देवीच्या चरणी डोकं टेकवण्याचे आणि आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मिळाले आहे. इथल्या ऊसाची आणि गंड्यालीची चव, कोण विसरू शकेल?

मित्रांनो, 

हिमाचलमध्ये राहत असताना मी नेहमी विचार करत असे, की या देवभूमीला निसर्गानं इतकं सुंदर वरदान दिलं आहे. नद्या, ओढे, सुपिक जमीन, शेतं, पहाड, पर्यटनाची इतकी शक्ती आहे, मात्र काही आव्हानं बघून त्याकाळात मला खूप वाईट वाटायचं, मन उदास व्हायचं. मी विचार करत असे की, या हिमाचलच्या या भूमीत जेव्हा संपर्क-दळणवळण व्यवस्था सुधारेल, हिमाचलमध्ये ज्या दिवशी उद्योग येणं वाढेल, ज्या दिवशी हिमाचलच्या मुलांना शिकण्यासाठी आपले आई-वडील, गाव, मित्र मंडळी सोडून बाहेर जावं लागणार नाही, त्या दिवशी हिमाचलचा कायापालट होईल. आणि आज बघा, आज मी इथे आलो आहे ते सगळे दळणवळणाशी संबंधित प्रकल्प आहेत, शिक्षणसंस्थांचे काम आणि औद्योगीकरण यासाठी देखील मोठ्या सेवाभावाने आम्ही भेट घेऊन आलो आहे. आज इथे ऊनामध्ये देशातल्या दुसऱ्या बल्क ड्रग पार्कचे काम सुरु झाले आहे. आता जरा हिमाचलच्या लोकांनी विचार करा, अडचणींनी ग्रासलेला हिमाचल, नैसर्गिक विविधतेने नटलेला हिमाचल आणि हिंदुस्तानात तीन बल्क ड्रग पार्क बनत आहेत आणि त्यातला एक हिमाचलच्या नशिबात यावा, याहून मोठी कुठली भेट असू शकते का मित्रांनो? याहून मोठा कुठला निर्णय असू शकतो का? हे हिमाचालवर जे प्रेम आहे, जे समर्पण आहे, त्याचा परिणाम आहे,

 मित्रांनो. 

काही वेळापूर्वीच मला अंब – अंदौरा ते दिल्लीपर्यंतच्या भारताच्या चौथ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवायचे सौभाग्य प्राप्त झाले. हादेखील विचार करा, देशातली चौथी वंदे भारत ट्रेन, इतका मोठा भारत  इतकी मोठ-मोठी शहरं, पण, चौथी ट्रेन जर कुणाला मिळाली तर माझ्या हिमाचलला मिळाली, बंधुंनो. आणि मला माहित आहे मित्रांनो, आज जर अनेक कुटुंब तुम्हाला भेटतील, हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात भेटतील, ज्यांना असं वाटत असेल की जाऊन एकदा विमानतळ बघावं, विमानात बसण्याचा विचार तर नंतरचा आहे. पण हिमाचलमध्ये पहाडांत राहणाऱ्या लोकांना आपण विचारलं तर दोन – दोन, तीन – तीन, चार – चार पिढ्या ज्यांच्या हयात असतील, त्यांनी न कधी ट्रेन बघितली असेल, न कधी ट्रेननी प्रवास केला असेल. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील अशी परिस्थिती आहे. आज हिमाचलमध्ये केवळ ट्रेनच नाही, हिंदुस्तानची सर्वात आधुनिक ट्रेन येऊन उभी आहे, बंधुंनो, आणि इथंपर्यंत प्रगती झाली. 
आजच हिमाचलची आपली ट्रिपल आयआयटी (IIIT) ची कायमस्वरूपी इमारत, त्याचे देखील लोकार्पण झाले आहे. हे प्रकल्प याची झलक आहेत की डबल इंजिनचे सरकार हिमाचलला कुठल्या उंचीवर घेऊन जात आहे. हे प्रकल्प खासकरून हिमाचलच्या नव्या पिढीच्या, तरुण पिढीच्या स्वप्नांना पंख देणारे आहेत. ऊनाला, हिमाचल प्रदेशला या प्रकल्पांसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा!

मित्रांनो, 

आपण सर्व जाणतोच की गरजा आणि आशा – आकांक्षांमध्ये फरक असतो. हिमाचलमध्ये आधी जी सरकारे होती, आणि दिल्लीत देखील लोक बसून असायचे, ते लोक तुमच्या गरजा पूर्ण करण्याच्या बाबतीत उदासीन होते आणि तुमच्या आशा – आकांक्षा त्यांना कधी कळल्याच नाहीत, त्यांनी कधी त्याची पर्वाच केली नाही. यामुळे माझ्या हिमाचलचं खूप मोठं नुकसान झालं आहे, इथल्या तरुण पिढीचं नुकसान झालं आहे, इथल्या माता – भगिनींचं नुकसान झालं आहे.  
मात्र, आता काळ बदलला आहे. आमचं सरकार केवळ लोकांच्या गरजाच पूर्ण करत नाही, तर जनता – जनार्दनाच्या आशा – अपेक्षा, पूर्ण करण्यासाठी सर्व शक्ती एकवटून कामाला लागलं आहे. यासाठी, मला आठवतं, हिमाचलची परिस्थिती काय होती, विकास कुठेच दिसत नव्हता, जेव्हा मी इथे यायचो. चारही दिशांना अविश्वासाची दरी, निराशेचे पहाड, पुढे जाऊ शकणार, नाही जाऊ शकणार, विकासाच्या अपेक्षांची खूप मोठी दरी, एक प्रकारे खड्डेच खड्डे. त्यांनी विकासाला होण्यासाठी हे खड्डे भरायचा कधीच विचार केला नाही, ते तसेच सोडून दिले. आम्ही ते खड्डे तर भरलेच, पण आता हिमाचलमध्ये नव्या मजबूत इमारती देखील बांधत आहोत.

मित्रांनो, 

जगात असे अनेक देश आहेत ज्यांनी 20 व्या शतकातच, मागच्या शतकातच आपल्या नागरिकांना, भारतात देखील गुजरात सारखी अनेक राज्ये आहेत, ग्रामीण रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, आधुनिक रुग्णालये. या सुविधा पुरवल्या आहेत. मात्र भारतात काही सरकारं अशी होती, ज्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी या सुविधा मिळवणं कठीण करून ठेवलं होतं. आपल्या डोंगराळ भागांना याचा खूप मोठा फटका बसला आहे. मी तर इथे राहत असताना सर्व जवळून बघत होतो की कशा आमच्या गरोदर माता – भगिनींना रस्ते नसल्यामुळे रुग्णालयांत जायला देखील त्रास होत होता, कितीतरी वृद्ध लोक रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शेवटचा श्वास घेत असत. 

बंधू – भगिनींनो, 

डोंगरात राहणारे लोक समजू शकतात की रेल्वे संपर्कव्यवस्था  नसण्याचा, ती सोय नसण्याचा, यामुळे ते एक प्रकारे जगापासून तोडले जातात. ज्या क्षेत्रात अनेक ओढे आहेत, नद्या वाहत आहेत, तिथे पिण्याच्या पाण्यासाठी वाट बघावी लागते, तिथे नळाद्वारे पाणी येणं किती मोठं आव्हान होतं, याची कल्पना बाहेरच्या लोकांना कधीच येऊ शकत नाही. 

ज्या लोकांनी वर्षानुवर्षे इथे सरकारं चालवली, त्यांना हिमाचलच्या त्रासामुळे जणू काही फरकच पडत नव्हता. आता आजचा नवा भारत, या जुन्या सगळ्या आव्हानांवर वेगाने काम करत आहे. ज्या सुविधा गेल्या शतकातच लोकांपर्यंत पोहोचायला हव्या होत्या, त्या आता लोकांपर्यंत पोहोचत आहेत. 

पण आपण एवढ्यावरच थांबणार आहोत का? तुम्ही सांगा मित्रांनो, इतकं केलं, खूप चांगलं केलं, इतक्यावरच थांबून चालेल का? आणखी पुढे जायचं आहे की नाही जायचं? आणखी वेगाने पुढे जायचं आहे की नाही जायचं? हे काम कोण करेल बंधूनो? आम्ही आणि तुम्ही मिळून करू, बंधूनो. आम्ही 20 व्या शतकातल्या सुविधा देखील पोहोचवू आणि 21 व्या शतकातल्या आधुनिकतेशी माझ्या हिमाचलला जोडू. 
म्हणूनच आज हिमाचलमध्ये विकासाची अभूतपूर्व कामं होत आहेत. आज एकीकडे हिमाचलमध्ये दुप्पट वेगाने ग्रामीण रस्ते बनवले जात आहेत तर दुसरीकडे वेगाने ग्रामपंचायतींपर्यंत ब्रॉडबँड कनेक्टिविटी देखील पोहोचवली जात आहे. आज एकीकडे हिमाचलमध्ये हजारो शौचालये बांधली जात आहेत तर दुसरीकडे गावागावात विजेची व्यवस्था सुधारली जात आहे. आज एकीकडे हिमाचलमध्ये ड्रोनद्वारे गरजेच्या वस्तू दुर्गम भागांत पोहोचविण्यावर काम होत आहे, तर दुसरीकडे वंदे भारत सारख्या ट्रेनने दिल्ली पर्यंत वेगाने पोहोचण्याचा मार्ग बनविला जात आहे.

***

Gopal C/Radhika/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai