नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधील भरूच येथील आमोद येथे 8000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले. पंतप्रधानांनी जंबुसर येथे बल्क ड्रग पार्क. दहेज येथीलखोल समुद्रातील पाइपलाइन प्रकल्प, अंकलेश्वर विमानतळाचा टप्पा 1 आणि अंकलेश्वर आणि पानोली येथे बहुस्तरीय औद्योगिक शेडचा विकास या प्रकल्पांची पायाभरणी झाली. गुजरातमधील रसायन क्षेत्राला चालना देणारे गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड (GACL) प्लांट, भरुच भूमिगत ड्रेनेज आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. (IOCL) दहेज कोयाली पाइपलाइन असे अनेक प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले.
सर्वप्रथम पंतप्रधानांनी मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली. दिवंगत मुलायमसिंह यादव यांच्या समवेतचे माझे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते, मुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा आमची भेट होत असे तेव्हा परस्परांमधील जवळीक आणि आपुलकीची जाणीव होत असे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना विविध नेत्यांना भेटत होतो, तेंव्हा मुलायम सिंग यांनी दिलेला सल्ला आणि आशीर्वाद आपल्यासाठी आजही तितकाच महत्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. बदलत्या काळातही मुलायम सिंग यांनी 2013 मध्ये दिलेले आशीर्वाद कायम राहिले आहेत, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी मागील लोकसभेच्या शेवटच्या सत्रात मुलायमसिंगजींनी दिलेल्या आशीर्वादाचे स्मरण केले. मुलायम सिंग यांनी कोणतेही राजकीय मतभेद मनात न बाळगता 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या पुनरागमनाचे भाकीत केले होते, अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. मुलायमसिंह जी हे सर्वाना सोबत घेऊन जाणारे नेते होते, असे ते म्हणाले. “आज, गुजरातच्या या भूमीवरून आणि माता नर्मदेच्या तीरावरून आदरणीय मुलायमसिंहजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना हे असह्य नुकसान सहन करण्याची शक्ती देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात आपण भरूच मध्ये आलो होतो, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भरूचच्या या भूमीने अशा सुपुत्रांना जन्म दिला आहे ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाचे नाव एका नवीन उंचीवर नेले आहे. त्यांनी संविधान सभेचे सदस्य आणि सोमनाथ चळवळीतील सरदार पटेल यांचे प्रमुख साथीदार कन्हैयालाल माणेकलाल मुन्शी आणि भारतीय संगीतातील महान कलाकार पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचे स्मरण केले. भरुचने गुजरातच्या आणि भारताच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, जेव्हा जेव्हा आपण भारताच्या इतिहासाचे वाचन करू आणि भविष्यातील भारताविषयी भाष्य करू, तेव्हा तेव्हा भरुचचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाईल, असे ते म्हणाले. भरुच जिल्ह्याच्या उदयोन्मुख जागतिक स्वरूपाचीही त्यांनी नोंद घेतली.
रसायन उद्योग क्षेत्रातील अनेकविध प्रकल्पांसोबतच भरूच मध्ये पहिल्या बल्क ड्रग पार्कचे लोकार्पण होत आहे. “दळणवळणाशी संबंधित दोन मोठे प्रकल्प देखील आज सुरू करण्यात आले आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले. अंकलेश्वर येथे भरूच विमानतळाची पायाभरणी देखील करण्यात आली आहे, जेणेकरून भरूच मधील नागरिकांना बडोदा आणि सुरत विमानतळांवर अवलंबून राहावे लागणार नाही. देशाच्या इतर कुठल्याही लहान शहरांपेक्षा भरूच मध्ये सर्वाधिक उद्योगधंदे आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आणि आता विमानतळाच्या उभारणीसह या क्षेत्राच्या विकासाला नवीन गती मिळेल,अशी अशा त्यांनी व्यक्त केली. एखाद्या उल्केच्या गतीने कामे पूर्ण करण्याच्या नरेंद्र – भूपेंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या कार्याचे हे फलित आहे, असे ते म्हणाले.
हा गुजरातचा नवीन चेहरा आहे, गेल्या दोन दशकात गुजरातने झपाट्याने प्रगती केली असून सर्वच बाबतीत पिछाडीवर असलेले राज्य अशी ओळख असलेल्या गुजरातचा चेहरामोहरा बदलून एक संपन्न औद्योगिक आणि कृषी राज्य अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. सतत कार्यमग्न असणारी बंदरे आणि विकसित होणाऱ्या किनारपट्ट्यामुळे आदिवासी आणि मच्छीमार समाजाचे जीवन बदलले. गुजरातच्या जनतेच्या मेहनतीमुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कालखंडात राज्यातील तरुणांसाठी सुवर्णकाळ सुरू झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण आता अडथळेविरहित सक्षम वातावरणाची निर्मिती करायला हवी आणि या संधीचा लाभ घ्यायला हवा. सक्षम वातावरणनिर्मितीचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी धोरण आणि हेतू यांची नितांत आव्यश्यकता असते. भरूच मधील सुधारलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत कृषी , आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी सुधारत गेली , याचाही त्यांनी उल्लेख केला. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी एकावेळी एकच प्रश्न कसा हाताळला आणि ते कसे सोडवले याची आठवण त्यांनी सांगितली. आजकालच्या मुलांना एकेकाळी अतिशय प्रचलित असलेला संचारबंदी हा शब्द माहित नसावा. आज आमच्या मुली केवळ सन्मानाने जगत नाहीत आणि उशिरापर्यंत काम करत नाहीत तर समाजाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करत आहेत, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे भरूच मध्येही शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याने युवा वर्गाला नवनवीन संधींची द्वारे खुली झाली आहेत. दीर्घकालीन नियोजन आणि आतापर्यन्त कमी प्रमाणात वापरलेल्या संसाधनांचा लाभ घेतल्यामुळे, गुजरात एक उत्पादन, औद्योगिक आणि व्यवसाय केंद्र म्हणून उदयास आले आहे त्याचप्रमाणे जागतिक दर्जाच्या अनेक सुविधा येथे उदयास आल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. डबल-इंजिन सरकार हे दुहेरी फायद्याचे उत्तम उदाहरण बनले आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
* * *
G.Chippalkatti/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Gratitude to the people of Amod for their welcome. Speaking at launch of various development works. https://t.co/TiaNR1x2L7
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2022
आज मुलायम सिंह यादव जी का निधन हो गया है।
— PMO India (@PMOIndia) October 10, 2022
मुलायम सिंह यादव जी का जाना देश के लिए एक बहुत बड़ी क्षति है: PM @narendramodi
Bharuch is the land of several greats. pic.twitter.com/wPsVe63IKj
— PMO India (@PMOIndia) October 10, 2022