Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गंधडा गुढी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर पंतप्रधानांनी या प्रकल्पाला दिल्या शुभेच्छा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंधडा गुढी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आत्मियतेेचा हा प्रकल्प होता. कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण संवर्धनाला समर्पित असा हा गंधडा गुढी चित्रपट आहे. दिवंगत पुनीत राजकुमार यांनी जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात स्थान  मिळविले आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त यावेळी केली आहे.

दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार यांच्या ट्विटचा हवाला देत पंतप्रधानांनी ट्विट केले;

अप्पू जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात राहतील. ते तेजस्वी व्यक्तिमत्व, उर्जेने परिपूर्ण आणि अतुलनीय प्रतिभेने   धनी होते. गंधडा गुढी हा चित्रपट निसर्ग मातेला, कर्नाटकचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित अशी भेट आहे. या प्रयत्नासाठी माझ्या शुभेच्छा.

***

M.Jaybhaye/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai