Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते शौर्य स्मारकाचे उद्‌घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते शौर्य स्मारकाचे उद्‌घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते शौर्य स्मारकाचे उद्‌घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते शौर्य स्मारकाचे उद्‌घाटन


भारतीय सैनिक हा मानवतेचे प्रतिक असून, जगात कुठेही नैसर्गिक आपत्ती असेल, तर आपले जवान स्वत:चा जीव धोक्यात घालतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांचे कौतुक केले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज मध्यप्रदेशात भोपाळ येथे शौर्य स्मारकाचे उद्‌घाटन झाले, त्यानंतर माजी सैनिकांच्या सभेत ते बोलत होते.

शिस्त आणि वर्तनाच्या बाबतीत भारतीय सैन्य जगात सर्वोत्कृष्ट असून, जगभरात शांतता नांदण्यासाठी या सैन्याने मोठे योगदान दिले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. येमेनमध्ये झालेल्या यादवीप्रसंगी भारतीय जवानांनी केवळ हजारो भारतीयांचीच नाही तर जगभरातल्या नागरिकांची सुखरुप सुटका केल्याचा गौरवास्पद उल्लेख पंतप्रधानांनी केला.

भारतीयांनी कधीही कुठल्या प्रांताना काबीज करण्याचा प्रयत्न केला नाही, उलट जेव्हा जगात मानवतेवर संकट आले, तेव्हा भारतीय सैनिकांनी स्वत:च्या प्राणांची बाजी लावून, परदेशातही शौर्य गाजवले, असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय जवानांची शक्ती, त्यांच्या मनोधैर्यात आहे, आणि हे मनोबल त्यांना 125 कोटी भारतीयांच्या शुभेच्छातून मिळते, असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सैनिकांच्या योगदानाविषयी बोलतांना ते म्हणाले की, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी अहोरात्र दक्ष राहणे आवश्यक आहे.

माजी सैनिकांसाठी “वन रँक वन पेन्शन” योजना लागू करुन केंद्र सरकारने आपले वचन पाळले आहे असेही पंतप्रधान म्हणाले.

N.SapreR.Aghor/Anagha