Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि कतार यांच्यात युवा आणि क्रीडा क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतच्या सामंजस्य कराराची केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती


भारत आणि कतार यांच्यात युवा आणि क्रीडा क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत 5 जून 2016 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या पहिल्या कार्यकारी कार्यक्रमाची केंद्रीय मंत्रिमंडळाला बैठकीत आज माहिती देण्यात आली.

क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यक आणि प्रशिक्षण तंत्रज्ञान या विषयातल्या ज्ञान, आणि तंज्ञाचा सल्ला मिळण्यासाठी या सामंजस्य करारामुळे मदत होणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंची कामगिरी उंचावयला त्याचबरोबर भारत आणि कतार यांच्यातले द्विपक्षीय संबंध मजबूत व्हायला मदत होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha