Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची आज त्यांच्या निवासस्थानी शीख प्रतिनिधीमंडळासमवेत भेट

पंतप्रधानांची आज त्यांच्या निवासस्थानी शीख प्रतिनिधीमंडळासमवेत भेट


नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी शीख प्रतिनिधीमंडळासोबत ची भेट घेतली.

दिल्लीतील गुरुद्वारा श्री बाला साहिब जी यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ‘अखंड पाठ’ आयोजित केला होता. 15 सप्टेंबर रोजी प्रारंभ झालेल्या ‘अखंड पाठाची’ 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी सांगता झाली. शीख प्रतिनिधीमंडळासोबत ने पंतप्रधानांची भेट घेऊन गुरुद्वारातून आणलेला प्रसाद आणि आशीर्वाद दिले.

भेटीदरम्यान शीख प्रतिनिधीमंडळाने पगडी बांधून आणि सिरोपा देऊन पंतप्रधानांचा सत्कार केला. पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली. शीख समुदायाच्या सन्मानासाठी आणि कल्याणासाठी पंतप्रधानांच्या पथदर्शी उपक्रमाबद्दल प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानले. 26 डिसेंबरला “वीर बाल दिवस” म्हणून घोषित करणे, कर्तारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा सुरू करणे, गुरुद्वारांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लंगरवरील जीएसटी हटवणे, अफगाणिस्तानातून गुरु ग्रंथसाहिबच्या प्रती भारतात पोहोचणे सुनिश्चित करणे यासह पंतप्रधानांनी केलेल्या अनेक प्रयत्नांना त्यांनी उजाळा दिला. 

शीख प्रतिनिधीमंडळात अखिल भारतीय केंद्रीय गुरु सिंग सभेचे अध्यक्ष तरविंदर सिंग मारवाह यांचा समावेश होता; अखिल भारतीय केंद्रीय गुरु सिंग सभेचे कार्याध्यक्ष वीर सिंग; केंद्रीय गुरु सिंग सभेचे दिल्ली प्रमुख नवीन सिंग भंडारी; टिळकनगरच्या गुरुद्वारा सिंग सभेचे अध्यक्ष हरबंस सिंग आणि गुरुद्वारा सिंग सभेचे मुख्य ग्रंथी राजिंदर सिंग यांचा समावेश होता.

 

* * *

R.Aghor/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai