पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात‘च्या आगामी भागासाठी कल्पना आणि सूचना देण्यासाठी लोकांना आमंत्रित केले आहे. MyGov, नमो ॲपद्वारे कल्पना आणि सूचना नोंदवल्या जाऊ शकतात किंवा आपल्या सूचना रेकॉर्ड करण्यासाठी 1800-11-7800 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. याशिवाय तुम्ही 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन एसएमएसद्वारे प्राप्त लिंकचे अनुसरण करत थेट पंतप्रधानांना आपल्या सूचना पाठवू शकता.
MyGov द्वारे दिलेले आमंत्रण शेअर करताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“#MannKiBaat कार्यक्रम, भारतभरातून येणाऱ्या विविध सूचना आणि प्रेरणादायी सामूहिक प्रयत्नांनी समृद्ध झाला आहे. या कार्यक्रमाने आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. नेहमीप्रमाणेच, 25 तारखेला होणाऱ्या या महिन्याच्या भागासाठी मी तुमच्या सूचना प्राप्त करण्यास उत्सुक आहे.”
#MannKiBaat is enriched by diverse inputs and inspiring collective efforts across India which have brought positive changes in our society. Like always, I look forward to receiving your inputs for this month’s episode which will take place on the 25th. https://t.co/GZyrY61gpk
— Narendra Modi (@narendramodi) September 12, 2022
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
#MannKiBaat is enriched by diverse inputs and inspiring collective efforts across India which have brought positive changes in our society. Like always, I look forward to receiving your inputs for this month's episode which will take place on the 25th. https://t.co/GZyrY61gpk
— Narendra Modi (@narendramodi) September 12, 2022