नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022
महामहिम, राष्ट्राध्यक्ष पुतिन,
सन्माननीय पाहुणे,
नमस्कार!
व्लादिवोस्तोक येथे आयोजित सातव्या पूर्वेकडील क्षेत्राच्या आर्थिक मंचासाठी मला तुमच्याशी दूरदृश्य माध्यमातून संपर्क साधण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. या महिन्यात व्लादिवोस्तोक येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या स्थापनेचा 30 वा वर्धापन दिन आहे. या शहरात वाणिज्य दूतावास उघडणारा भारत हा पहिला देश होता. आणि तेव्हापासून हे शहर आपल्या नात्यातील अनेक महत्वपूर्ण टप्प्यांचा साक्षीदार आहे.
मित्रांनो,
2015 मध्ये स्थापन झालेला हा मंच आज रशियाच्या सुदूर पूर्व क्षेत्राच्या विकासात आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक प्रमुख जागतिक मंच बनला आहे. यासाठी मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
2019 मध्ये मला या मंचात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यावेळी आम्ही भारताचे ‘अॅक्ट फार-इस्ट’ धोरण जाहीर केले. आणि त्याचा परिणाम म्हणून रशियाच्या सुदूर पूर्वेच्या क्षेत्राबाबत भारताचे सहकार्य विविध क्षेत्रात वाढले आहे. आज, हे धोरण भारत आणि रशियाच्या “विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी” चा प्रमुख आधारस्तंभ बनला आहे.
मित्रांनो,
आपण आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरिडॉर, चेन्नई-व्लादिवोस्तोक सागरी कॉरिडॉर किंवा उत्तरी सागरी मार्गाबद्दल बोलत असतो, अशात दळणवळण भविष्यात आपल्या संबंधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल.
आर्क्टिक्ट मुद्द्यांवर रशियासोबतची भागीदारी मजबूत करण्यासाठी भारत उत्सुक आहे. ऊर्जा क्षेत्रातही सहकार्याची अपार क्षमता आहे. ऊर्जेसोबतच भारताने रशियन सुदूर पूर्वेकडील क्षेत्रात औषध निर्माण आणि हिऱ्यांच्या क्षेत्रातही लक्षणीय गुंतवणूक केली आहे.
रशिया, कोकिंग कोळशाच्या पुरवठ्याद्वारे भारतीय पोलाद उद्योगासाठी महत्त्वाचा भागीदार बनू शकतो. प्रतिभावंतांबाबतही आपल्यात चांगले सहकार्य असू शकते. जगातील अनेक विकसित प्रदेशांच्या विकासात भारतीय प्रतिभेने योगदान दिले आहे. मला विश्वास आहे की भारतीयांची प्रतिभा आणि व्यावसायिकता रशियन सुदूर पूर्वेमध्ये जलद विकास घडवून आणू शकते.
मित्रांनो,
भारताच्या “वसुधैव कुटुंबकम” या प्राचीन सिध्दांताने आपल्याला जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहण्यास शिकवले आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या जगात, जगाच्या एका भागातील घटनेचे पडसाद चा संपूर्ण जगावर पडतात.
युक्रेन संघर्ष आणि कोविड महामारीचा जागतिक पुरवठा साखळींवर मोठा परिणाम झाला आहे. अन्नधान्य, खते आणि इंधनाचा तुटवडा ही विकसनशील देशांसाठी मोठी चिंता आहे. युक्रेन संघर्षाच्या सुरुवातीपासूनच आम्ही मुत्सद्दीपणा आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याच्या गरजेवर भर दिला आहे. हा संघर्ष संपवण्यासाठी आम्ही सर्व शांततापूर्ण प्रयत्नांना पाठिंबा देतो. या संदर्भात, आम्ही तृणधान्ये आणि खतांच्या सुरक्षित निर्यातीसंबंधीच्या अलीकडील कराराचे स्वागत करतो.
मला या मंचावर संबोधन करण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा अध्यक्ष पुतिन यांचे आभार मानतो. आणि या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सहभागींना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद.
G.Chippalkatti /V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
My remarks at the Plenary Session of 7th Eastern Economic Forum being held in Vladivostok. https://t.co/z3wM3ZPxNT
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2022
मुझे ख़ुशी है कि व्लादि-वोस्तोक में आयोजित किए जा रहे सातवें Eastern Economic Forum में आपसे वर्चुअल रूप से जुड़ने का मौका मिला।
— PMO India (@PMOIndia) September 7, 2022
इसी महीने, Vladivostok में भारत के कांसुलेट की स्थापना के तीस वर्ष पूरे हो रहे हैं।
इस शहर में कांसुलेट खोलने वाला पहला देश भारत ही था: PM
2019 में मुझे इस फ़ोरम में रू-ब-रू हिस्सा लेने का मौका मिला था।
— PMO India (@PMOIndia) September 7, 2022
उस समय हमने भारत की “Act Far-East” नीति की घोषणा की थी।
और परिणामस्वरूप, Russian Far East के साथ विभिन्न क्षेत्रों में भारत का सहयोग बढ़ा है: PM @narendramodi
आज यह नीति भारत और रूस की “Special and Privileged Strategic Partnership” की एक प्रमुख स्तम्भ बन गयी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 7, 2022
भारत आर्कटिक विषयों पर रूस के साथ अपनी भागीदारी को मजबूत करने के लिए इच्छुक है।
— PMO India (@PMOIndia) September 7, 2022
ऊर्जा के क्षेत्र में भी सहयोग की अपार संभावनाएं हैं।
उर्जा के साथ-साथ, भारत ने pharma और diamonds के क्षेत्रों में भी Russian Far East में महत्वपूर्ण निवेश किये हैं: PM @narendramodi
आज के globalized world में, विश्व के किसी एक हिस्से की घटनाएं पूरे विश्व पर प्रभाव पैदा करती हैं।
— PMO India (@PMOIndia) September 7, 2022
यूक्रेन संघर्ष और कोविड महामारी से ग्लोबल सप्लाई चेन्स पर बड़ा असर पड़ा है।
Foodgrain, Fertilizer, और Fuel की कमी विकासशील देशों के लिए बड़ी चिंता के विषय हैं: PM @narendramodi
यूक्रेन संघर्ष की शुरुआत से ही, हमने diplomacy और dialogue का मार्ग अपनाने की आवश्यकता पर जोर दिया है।
— PMO India (@PMOIndia) September 7, 2022
हम इस संघर्ष को समाप्त करने के लिए सभी शांतिपूर्ण प्रयासों का समर्थन करते है: PM @narendramodi