उद्या म्हणजे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. उद्या सायंकाळी 4:30 वाजता 7, लोककल्याण मार्ग येथे हा कार्यक्रम होईल.
देशातील काही सर्वोत्कृष्ट शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाबद्दल आदर व्यक्त करणे, ज्यांनी केवळ आपली कटिबद्धता आणि कठोर परिश्रमातून केवळ शालेय शिक्षणाचा दर्जाच उंचावला नाही तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे आयुष्यही समृद्ध केले, अशा शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा उद्देष्य आहे.
राष्ट्रीय पुरस्कारांद्वारे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये काम करणार्या गुणत्तापूर्ण शिक्षकांना सार्वजनिक मान्यता दिली जाते. या वर्षी पुरस्कारासाठी देशभरातील 45 शिक्षकांची निवड तीन ऑनलाईन टप्प्यांतील कठोर आणि पारदर्शक प्रक्रियेतून करण्यात आली आहे.
***
A.Chavan/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai