Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यामधील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यामध्ये झालेला रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.  पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘‘ कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यामध्ये झालेला रस्ते अपघात हृदय हेलावून टाकणारा आहे. शोकाकुल परिवारांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना. अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांच्या जवळच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रूपयांचे अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रूपयांची मदत दिली जाईल” पंतप्रधान.

***

S.Thakur/S.Bedekar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai