Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मालदिवच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत भारत दौऱ्यातील फलनिष्पत्तींची यादी


अ. प्रकल्पांचे पुनरावलोकन

1. ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा पहिला टप्पा- 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा भारत अर्थसहाय्यित प्रकल्प- कायमस्वरूपी कामांची सुरूवात

2. हुलहुमले येथील 4,000 सामाजिक गृहनिर्माण सदनिकांच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. एक्झिम बँक ऑफ इंडियाच्या बायर्स क्रेडिट फायनान्स अंतर्गत यासाठी 227 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सअर्थसहाय्य केले आहे.

3. अड्डू रस्ते आणि 34 बेटांमधील पाणी, स्वच्छता तसेच फ्रायडे मशीद जीर्णोद्धार प्रकल्पांसह भारत मालदीव विकास सहकार्याचा आढावा

 

 ब . करार/सामंजस्य करारांची देवाणघेवाण

 

1. एनआयआरडीपीआर, भारत आणि स्थानिक सरकारी प्राधिकरण, मालदीव यांच्यात मालदीवच्या स्थानिक परिषद आणि महिला विकास समितीच्या सदस्यांच्या क्षमता निर्माण आणि प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार

2.आयएनसीओआयएस, भारत आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालय मालदीव यांच्यात संभाव्य मासेमारी क्षेत्र अंदाज क्षमता निर्माण, डेटा सामायिकरण आणि सागरी वैज्ञानिक संशोधनामध्ये सहकार्यावर सामंजस्य करार

3. भारताच्या सीईआरटी- आणि मालदीवच्या एनसीआयटी यांच्यात सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

4. भारताच्या एनडीएमए आणि मालदीवच्या एनडीएमए यांच्यात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार

5. भारताच्या एक्झिम बँक आणि मालदीव वित्त मंत्रालय यांच्यात मालदीवमधे पोलिस पायाभूत सुविधा उभारण्यासाठी  41 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा बायर्स क्रेडिट अर्थसहाय्याचा करार

6. हुलहुमाले येथे बांधल्या जाणार्‍या अतिरिक्त 2,000 सामाजिक गृहनिर्माण सदनिकांसाठी  119 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स बायर्स क्रेडिट निधीच्या मंजुरीवर एक्झिम बँक ऑफ इंडिया आणि मालदिव वित्त मंत्रालय यांच्यात इरादा पत्र

 

क. घोषणा

 

1. मालदीवमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी  100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स नवीन कर्ज हमीचा विस्तार

2. कर्ज हमी अंतर्गत  128 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या हनीमधू विमानतळ विकास प्रकल्पासाठी ईपीसी कंत्राटाला  मान्यता

3. कर्ज हमी अंतर्गत गुल्हिफाहलू बंदर विकास प्रकल्पाच्या डीपीआरला मान्यता आणि 324 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या निविदा प्रक्रियेची सुरुवात

4. कर्ज हमी अंतर्गत  30 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या कर्करुग्णालय प्रकल्पासाठीचा व्यवहार्यता अहवाल आणि वित्तीय समापनाची मान्यता

5. हुलहुमाले मधील अतिरिक्त 2,000 सामाजिक गृहनिर्माण सदनिकांसाठी एक्झिम बँक ऑफ इंडियाद्वारे 119 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे बायर्स क्रेडिट वित्तपुरवठा

6. मालदीवमधून भारताला करमुक्त टूना निर्यात करण्याची सुविधा

7. मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाला पूर्वी प्रदान केलेल्या -सीएसजी हुरावी जहाजाच्या जागी  बदली जहाजाचा पुरवठा

8. मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाला दुसऱ्या लँडिंग क्राफ्ट असॉल्टचा (एलसीए) पुरवठा

9. मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाला 24 लोकोपयोगी वाहने भेट

****

S.Thakur/V.Ghode/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com