Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवन इमारतीच्या छतावरील राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण

पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवन इमारतीच्या छतावरील राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण


नवी दिल्ली, 11 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी नवी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या छतावर बांधलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण झाले.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे–

“संसद भवनाच्या छतावर उभारलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे आज सकाळी अनावरण करण्याचा सन्मान मिळाला.

यावेळी पंतप्रधानांनी संसद भवनाच्या उभारणीसाठी कष्ट घेणाऱ्या श्रमिकांशीही संवाद साधला.

हे संसद भवन बांधण्यासाठी कष्ट करणाऱ्या सर्व श्रमिकांशी माझा अत्यंत चांगला संवाद झाला. त्यांच्या सर्व प्रयत्नांचा आम्हाला अत्यंत अभिमान असून देशासाठी त्यांनी दिलेले योगदान आम्हाला कायम लक्षात राहील. 

हे राष्ट्रीय मानचिन्ह ब्रॉन्झपासून बनवले असून त्याचे एकूण वजन 9500 किलोग्राम आहे. तर उंची 6.5 मीटर इतकी आहे. या मानचिन्हाला आधार देणारी, 6500 किलोग्रामची पोलादाची रचना देखील त्याच्याभोवती बसवण्यात आली आहे. नव्या संसद भवनाच्या बरोबर मध्यावर हे मानचिन्ह बसवण्यात आले आहे.

या मानचिन्हाची संकल्पना रेखाटन आणि आणि त्यानंतर तसा आकार देऊन ते तयार करणे हे काम  तसेच, मानचिन्हाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वी आठ विविध स्तरांवर काम करण्यात आले होते. यात, क्ले मॉडेलिंग/कम्प्युटर ग्राफीकच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com