Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उपराष्ट्रपतींच्या “सिटिझन ॲण्ड सोसायटी” पुस्तकाचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन प्रसंगी पंतप्रधानांची टिप्पणी

उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी लिहिलेल्या “सिटिझन ॲण्ड सोसायटी” पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी पुस्तकाच्या माध्यमातून भावी पिढीसमोर आपले विचार मांडल्याबद्दल उपराष्ट्रपतींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आज तंत्रज्ञानाने नागरिकांचे नेटिझन्समध्ये परिवर्तन केले आहे आणि पारंपारिक सीमा पुसून टाकल्या आहेत. ते म्हणाले की, मात्र भारतात नागरिक आणि समाज यांच्यामध्ये कुटुंब ही संस्था आहे जी आपली सर्वात मोठी ताकद आहे.

ते म्हणाले की, अनेक प्रकारच्या बोली आणि भाषा तसेच विविध प्रकारच्या श्रध्दा असूनही सर्वांमध्ये सुसंवाद असलेला देश म्हणून भारताला अभिमान वाटायला हवा. हे सर्व घडून येण्यासाठी सर्व नागरिकांनी योगदान दिल्याचे ते म्हणाले.

B.Gokhle /S.Kane/V.Deokar