Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पायाभूत विकासावरील खर्च वाढवण्यासाठी अतिरिक्त अंदाजित निधी वाढवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पायाभूत विकासावरील खर्च वाढवण्यासाठी 2016-17 या आर्थिक वर्षात, एकूण 31,300 कोटी रुपये उभे करायला आणि 16,300 कोटी रुपयांचे मुद्दल आणि व्याज सरकारने भरायला मंजुरी दिली.

31,300 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अंदाजे निधीपैकी, पीएफसी, आयआरईडीए, आयडब्ल्यूएआय आणि नाबार्ड निधी उभारतील आणि केंद्र सरकार 16,300 कोटी रुपयांवरील व्याज संबंधित मंत्रालये / विभागांच्या मागणीत योग्य अर्थसंकल्पीय तरतुदी करुन भरेल.

पायाभूत क्षेत्रावरील खर्च वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पूरक मदत करणे हा या मागचा उद्देश आहे.

B.Gokhale/S.Kane/D. Rane