Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची स्वीडनच्या पंतप्रधानांशी चर्चा

पंतप्रधानांची स्वीडनच्या पंतप्रधानांशी चर्चा


नवी दिल्ली, 4 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या भारत- नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोपनहेगन येथे स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.

भारत आणि स्वीडन यांच्यामध्ये समान मूल्ये, सशक्त व्यापार, गुंतवणूक तसेच संशोधन आणि विकास संबंध यांच्या संदर्भात दीर्घकालीन घनिष्ठ संबंध आहेत आणि दोन्ही देशांच्या जागतिक शांतता, सुरक्षा आणि विकास, अभिनव संशोधन, तंत्रज्ञान, गुंतवणूक तसेच संशोधन आणि विकासविषयक सहकार्य यांच्या प्रती असलेल्या समान दृष्टिकोनाने या आधुनिक संबंधांना भक्कम पाया लाभला आहे. पहिल्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2018 मध्ये स्वीडन भेटीदरम्यान  दोन्ही देशांनी विस्तृत प्रमाणात संयुक्त कृती योजनांचा स्वीकार केला होता तसेच संयुक्त नवोन्मेष भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या देखील केल्या होत्या.

आजच्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच उद्योग संक्रमणविषयक प्रमुख उपक्रमांनी केलेल्या प्रगतीबद्दल या नेत्यांनी समाधान देखील व्यक्त केले. हा भारत-स्वीडन यांचा संयुक्त जागतिक उपक्रम असून सप्टेंबर 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान कृती शिखर परिषदेमध्ये उद्योग संक्रमण या विषयावर नेतृत्व गटाची स्थापना करण्यात आली होती. जगात सर्वात अधिक प्रमाणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना कमी-कार्बन उत्सर्जन असणाऱ्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या नेतृत्व गटाच्या स्थापनेमागील उद्देश होता. या गटात आता 16 देश आणि 19 कंपन्या सहभागी असल्यामुळे त्याची सदस्यसंख्या वाढून 35 झाली आहे.

दोन्ही पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान अभिनव संशोधन, हवामान तंत्रज्ञान, हवामानविषयक कृती, हरित हायड्रोजन, अवकाश क्षेत्र, संरक्षण, नागरी हवाई उड्डाण, आर्क्टिक, ध्रुवीय संशोधन, शाश्वत खनन तसेच व्यापार आणि आर्थिक संबंध या बाबतीत सहकार्य वाढविण्याच्या शक्यतांबाबत देखील चर्चा केली.

या भेटीत दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक तसेच जागतिक घडामोडींबद्दल देखील चर्चा केली.

 

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com