Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डेन्मार्कच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक

डेन्मार्कच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक


नवी दिल्ली, 3 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.

दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी समोरासमोर थेट पद्धतीने चर्चा केल्यानंतर प्रतिनिधी मंडळ स्तरावरील चर्चा झाली.

दोन्ही पंतप्रधानांनी भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या चर्चांमध्ये नूतनीकरणीय उर्जा विषयक सहकार्य, विशेषतः सागरकिनाऱ्यावरील पवनउर्जा आणि हरित हायड्रोजन, तसेच कौशल्यविकास, आरोग्य, नौवहन, पाणीप्रश्न आणि आर्क्टिक यांसह अनेक विषयांचा समावेश होता.

डेन्मार्कमधील कंपन्यांनी आपल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी भारताला सकारात्मक योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली तर डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिकसेन यांनी भारतीय कंपन्यांनी डेन्मार्कमध्ये घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचा ठळक उल्लेख केला.

दोन्ही देशांच्या जनतेदरम्यान विस्तारत असलेल्या सहकारी संबंधांचे दोन्ही नेत्यांनी कौतुक केले आणि  स्थलांतर तसेच वाहतूकविषयक भागीदारीबाबतच्या स्वारस्य घोषणापत्राचे स्वागत केले.

दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक तसेच जागतिक समस्यांबद्दलच्या दृष्टीकोनांचे आदानप्रदान देखील केले.

या बैठकीतील प्रतिनिधी स्तरावरील चर्चेनंतर संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले. ते येथे वाचता येईल.

या बैठकीदरम्यान झालेल्या करारांची यादी येथे वाचता येईल.

 

 

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com