Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे मार्गदर्शन


फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल आपणा सर्व युवा मित्रांना खूप-खूप शुभेच्छा ! आज होळीचा सण आहे. देशवासियांना,आपणा सर्वाना, अकादमीच्या लोकांना आणि आपल्या कुटुंबियांना होळीच्या खूप-खूप शुभेच्छा !आज आपल्या अकादमी द्वारे सरदार वल्लभभाई पटेल जी, लाल बहादूर शास्त्री जी यांना समर्पित टपाल प्रमाणपत्रेही जारी करण्यात आली आहेत. आज नव्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन आणि हॅपी व्हॅली कॉम्प्लेक्सचे लोकार्पणही झाले आहे. या  सुविधा  संघ भावना, आरोग्य आणि फिटनेसची भावना बळकट करतील, प्रशासकीय सेवा अधिक नेटक्या आणि प्रभावी करण्यासाठी सहाय्य करतील.

मित्रहो,

मागच्या वर्षांमध्ये मी अनेक तुकड्यांमधल्या  सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे, त्यांच्या समवेत  बराच वेळ व्यतीत केला. मात्र आपली तुकडी आहे, ती माझ्या दृष्टीने विशेष खास आहे. आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात या  अमृत महोत्सवाच्या काळात  आपले काम सुरु करत आहात.

भारत आपल्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात प्रवेश करेल तेव्हा आमच्यापैकी बरेच जण नसतील, मात्र आपली ही तुकडी त्या वेळी असेल, आपणही असाल. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, पुढच्या 25 वर्षातल्या देशाच्या विकासात, तुमच्या यशोगाथांची, आपल्या या

तुकडीची मोठी भूमिका राहणार आहे.

मित्रहो,

21 व्या शतकात भारत ज्या स्थानावर आज आहे, अवघ्या जगाचे लक्ष आज हिंदुस्तानकडे लागले आहे.कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून एक नवी जागतिक व्यवस्था उदयाला येत आहे. या  नव्या जागतिक व्यवस्थेत भारताला आपली भूमिका वाढवायची आहे आणि वेगाने आपला विकासही साध्य करायचा आहे. मागच्या  75 वर्षात आपण ज्या वेगाने प्रगती केली आहे त्याच्या अनेक पटीने पुढे जायचा हा काळ आहे. येत्या काळात आपण एखादा जिल्हा सांभाळत असाल आपल्याकडे एखाद्या विभागाचा कार्यभार असेल, कधी आपल्या देखरेखीखाली एखादा मोठा पायाभूत प्रकल्प  सुरु असेल, कधी आपण धोरणात्मक स्तरावर सूचना देत असाल.या  सर्व  कामांमधून आपणा सर्वाना एक गोष्ट सदैव लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे 21 शतकातले भारताचे सर्वात मोठे उद्दिष्ट. हे उद्दिष्ट म्हणजे आत्मनिर्भर भारत, आधुनिक भारत. आपल्याला हा काळ वाया घालवायचा नाही म्हणूनच  आज मोठ्या अपेक्षा घेऊन मी आपणा सर्वांमध्ये आलो आहे.  या अपेक्षा आपल्या व्यक्तित्वाशी संबंधित आहेत, आपल्या कर्तृत्वाशीही संबंधित आहेत. आपल्या काम करण्याच्या पद्धतीशीही, कार्य संस्कृतीशी संबंधित आहेत. म्हणूनच छोट्या-छोट्या गोष्टींपासून मी सुरवात करतो, ज्या कदाचित आपल्या व्यक्तित्वासाठी उपयोगी ठरतील.

मित्रहो,  

प्रशिक्षणा दरम्यान आपल्याला सरदार पटेल यांचा  दृष्टीकोन, त्यांचे विचार यांच्याशी आपला परिचय   करून देण्यात आला. सेवा भाव आणि कर्तव्य भाव या  दोन्हींचे महत्व आपल्या प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. आपण जितकी वर्षे या  सेवेत राहाल, आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचे मोजमाप या घटकांवरून व्हायला हवे. सेवाभाव तर कमी होत नाही ना, कर्तव्य भावना तर कमी होत नाही ना हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. मूल्यमापन केले पाहिजे, हे लक्ष्य धूसर  तर   होत नाही ना,सदैव आपले हे लक्ष्य समोर राहिले पाहिजे. यामध्ये बदल होता कामा नये.आपण सर्वानी पाहिले आहे की, ज्या कोणामध्ये सेवा भाव कमी झाला, ज्या कोणावर सत्ता भाव वरचढ झाला, ती व्यक्ती असो वा व्यवस्था त्याचे मोठे नुकसान होते. कोणाचे लवकर होते, तर कोणाचे उशिराने होते मात्र नुकसान नक्कीच होते.

मित्रहो,

मला वाटते आपल्या कामी आणखी एक गोष्ट येऊ शकते. आपण जेव्हा कर्तव्य आणि उद्देश या भावनेने काम करतो तेव्हा ते कधीच ओझे वाटत नाही. आपणही इथे एका उद्देशाने आला आहात. समाजासाठी, देशासाठी एका सकारात्मक परिवर्तनाचा भाग बनण्यासाठी आला आहात.  आदेश देऊन काम करून घेणे आणि दुसऱ्यांना कर्तव्य भावनेने प्रेरित करून  काम करून घेणे या दोन्हीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. खूपच मोठा फरक असतो. हा एक नेतृत्व गुण आहे, जो आपल्याला स्वतः मध्ये विकसित करायचा आहे. संघ भावनेसाठी हे अनिवार्य आहे. यामध्ये कोणतीही तडजोड शक्य नाही. हे करणे खूपच आवश्यक आहे.       

                    मित्रहो,

आतापासून काही महिन्यातच आपण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाल.आपल्या  पुढच्या  जीवनात फाईल आणि फिल्ड यातला फरक जाणून घेऊन काम करायचे आहे. फाईल मध्ये आपल्याला खरा अनुभव येणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष ते  ठिकाण अनुभवायला हवे. मी सांगितलेली  बाब  जीवनात सदैव लक्षात ठेवा, फाईल मधले आकडे म्हणजे केवळ संख्या नव्हे तर प्रत्येक आकडा, प्रत्येक  संख्या म्हणजे एक जीवन असते. त्या जीवनात काही स्वप्ने असतात, काही आकांक्षा असतात, त्या जीवनासमोर काही समस्या असतात, आव्हाने असतात.  म्हणूनच आपल्याला त्या आकड्यांसाठी नव्हे तर प्रत्येक जीवनासाठी काम करायचे आहे. माझ्या मनातली आणखी एक भावना मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. हा मंत्र आपल्याला निर्णय घेण्यासाठीचे धाडस देईल आणि तो आपण आचरणात आणलात तर आपल्याकडून चूक होण्याची शक्यता कमी होईल.  

        मित्रहो,

आपण जिथे जाल तिथे आपल्यात एक उत्साह, एक उमेद असेल, नवीन काही करण्याची उर्मी असेल.मी हे करेन, मी ते करेन, यामध्ये बदल घडवेन, हे मोडीत काढेन, मनात खूप काही असेल. मनात जेव्हा विचार येईल की हे ठीक नाही, यात बदल आवश्यक आहे, तेव्हा आपल्याला वर्षानुवर्षे सुरु असलेल्या अनेक व्यवस्था दिसतील, अनेक नियम दिसतील जे आपल्याला कालबाह्य  वाटत असतील, योग्य वाटत नसतील. हे नियम म्हणजे ओझे आहे असे आपल्याला वाटत असेल. असा विचार योग्य नाही असे मला म्हणायचे नाही. आपल्याकडे अधिकार असेल तर मनात येईल की असे नको, हे नको, हे करता येईल 

मात्र थोडा धीर ठेवत, मी जो मार्ग दाखवत आहे त्यावर वाटचाल करता येईल का. आपल्याला एक सल्ला देऊ इच्छितो. ही व्यवस्था का निर्माण झाली,कोणत्या परिस्थितीत झाली,कोणत्या वर्षी झाली,तेव्हा परिस्थिती काय होती, फाईल मधला एक-एक शब्द, परिस्थिती आपण डोळ्यासमोर आणा, 20 वर्षापूर्वी, 50, 100 वर्षापूर्वी याची निर्मिती कशासाठी झाली असेल, त्याचे मूळ कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा.  मग विचार करा,म्हणजे याचा पूर्ण अभ्यास करा की जी व्यवस्था निर्माण करण्यात आली त्यामागे काही विचार असेल, आवश्यकता असेल.हा नियम तयार करण्यात आला त्यामागे काय कारण असेल याच्या मुळापर्यंत जा.  जेव्हा आपण त्याचा अभ्यास कराल, कारणाच्या मुळाशी जाल तेव्हा आपण कायमस्वरूपी तोडगा देऊ शकाल. घाई-गडबडीने केलेले काम त्या वेळी कदाचित योग्य वाटेल. मात्र कायम स्वरूपी तोडगा नाही देऊ शकणार. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केल्याने त्या क्षेत्रातल्या प्रशासनावर आपली मजबूत पकड येईल. हा सर्व अभ्यास केल्यानंतर आपल्याला निर्णय घायचा असेल तर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा.

महात्मा गांधी नेहमी सांगत असत, आपल्या निर्णयाने समाजाच्या शेवटच्या स्तरात असलेल्या व्यक्तीला लाभ होत असेल तर तो निर्णय घेण्यासाठी जराही  संकोच करू नका.यामध्ये आणखी एका बाबीची भर मी घालू इच्छितो,आपण जो निर्णय घ्याल, व्यवस्थेमध्ये जे परिवर्तन  कराल,तेव्हा संपूर्ण भारताच्या संदर्भात अवश्य विचार करा कारण आपण  अखिल भारतीय सनदी  सेवेचे प्रतिनिधित्व करत आहात. आपला  निर्णय जरी स्थानिक भागासाठी असला तरी  स्वप्न मात्र संपूर्ण देशाचेच असेल.

मित्रहो,

स्वातंत्र्याच्या या अमृत काळात  आपल्याला रीफॉर्म,परफॉर्म ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री नव्या शिखरावर न्यायची आहे म्हणूनच आजचा भारत ‘सबका प्रयास’ या  भावनेने  वाटचाल करत आहे. आपल्या प्रयत्नात आपल्यालाही  हे जाणून घ्यावे लागेल की सर्वांचे प्रयत्न, सर्वांची भागीदारी याचे सामर्थ्य काय असते. आपल्या कार्यात जितके भाग आहेत त्या सर्वाना जोडण्याचा प्रयत्न करा, ही तर पहिली  पायरी झाली, पहिले वर्तुळ झाले. मात्र सामाजिक संघटना जोडल्या, सर्वसामान्यांना जोडल्यावर मोठे वर्तुळ होईल, एक प्रकारे सबका प्रयास, समाजाच्या तळाशी असलेली व्यक्तीही आपल्या प्रयत्नांचा भाग असली पाहिजे. आपण हे काम केले तर आपण कल्पनाही करू शकणार नाही इतके आपले बळ वाढेल.  मोठ्या शहरासाठी आपल्याकडे  महानगरपालिका असते. पालिकेकडे सफाई कर्मचारी असतात, ते परिश्रम करतात, शहर स्वच्छ राखण्यासाठी कठोर मेहनत करतात. मात्र त्यांच्या प्रयत्नांना प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक नागरिकाची जोड मिळाली, स्वच्छता ही लोकचळवळ झाली तर या  सफाई कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा उत्सव ठरेल की नाही. जो परिणाम असतो तो अनेक पटीने वाढेल की नाही. कारण सबका प्रयास, सर्वांचे प्रयत्न एक सकारात्मक परिणाम घडवतो. जन भागीदारीतून एक आणि एक दोन नव्हे तर एक आणि एक मिळून अकरा होतात.

मित्रहो,  

आज मी आपल्याकडे आणखी एक कार्य सोपवू इच्छितो, हे कार्य आपल्याला आपल्या संपूर्ण  कारकिर्दीत करत राहायचे आहे. एका प्रकारे त्याला आपल्या जीवनाचा भाग करायचे आहे, त्याला  सवयीचे स्वरूप द्यायचे आहे.  माझ्या मते संस्कार म्हणजे प्रयत्नपूर्वक विकसित केलेली चांगली सवय.

आपण जिथे काम कराल, ज्या जिल्ह्यात काम कराल,  आपण मनात निश्चय करा की या  जिल्ह्यात इतक्या अडचणी आहेत, जिथे पोहोचायला हवे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तर आपले विश्लेषण असेल. आपल्या मनात येईल की आधीच्या लोकांनी हे का केले नाही. 

***

SP/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com