Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेचे परराष्ट्र आणि वाणिज्य मंत्री आणि पंतप्रधान मोदी यांची भेट

अमेरिकेचे परराष्ट्र आणि वाणिज्य मंत्री आणि पंतप्रधान मोदी यांची भेट


अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन कॅरी आणि अमेरिकेचे वाणिज्य मंत्री पेनी प्रिटझकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

भारत आणि व्यावसायिक पातळीवर झालेल्या चर्चेची माहिती या दोन्ही अमेरिकी मंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली. जून 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेला भेट देऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली होती, त्याविषयी झालेल्या प्रगतीची चर्चा या भेटीत करण्यात आली.

भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान लष्करी क्षेत्रातील सहकार्याचा अधिक विस्तार गेल्‍या दोन वर्षापासून होत आहे, त्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी समाधान व्यक्त केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बरोबर जूनमध्ये झालेल्या शिखर परिषदेत या विषयांवर सहकार्याबाबत चर्चा केली त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही होईल, अशी आपल्याला आशा असल्याचे मनोगतही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.

चीनमध्ये लवकरच होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेमध्ये राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना भेटण्यास आपण उत्सूक असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

NS/SB/AK