Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान आणि इजिप्त राष्ट्रपती यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतील निवेदन

पंतप्रधान आणि इजिप्त राष्ट्रपती यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतील निवेदन


सन्माननीय राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी,

माननीय मंत्री, इजिप्त आणि भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य

आणि

प्रसार माध्यमातील मित्रांनो,

माननीय अब्देल फतह अल सीसी हे प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. महोदय, देश आणि विदेशात आपण खूप महान कार्य केले आहे. भारताच्या सव्वाशे कोटी जनतेला आपण आमच्या देशात आल्याबद्दल आनंद झाला आहे. इजिप्त देश आशिया आणि अफ्रिका यांना जोडणारा नैसर्गिक सेतू आहे. नेमस्त-मध्यम मार्गी इस्लामचा आवाज म्हणजे आपल्या देशातील जनता आहे. अफ्रिका आणि अरब जगतामध्ये प्रादेशिक शांतता आणि स्थिरता असलेल्या देशांपैकी आपला एक देश आहे. विकसनशील देशांमध्येही इजिप्त नेहमीच आघाडीवर असणारा देश आहे.

मित्रहो,

आमच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंधांना नवे परिमाण लाभावे, यादृष्टीने राष्ट्रपतींबरोबर माझी अतिशय महत्वपूर्ण चर्चा झाली. आमच्या गुंतवणुकीच्या पूर्ततेसाठी कृती कार्यक्रम तयार करण्यावर या चर्चेत आम्ही मान्य केले आहे.

कृतीकार्यक्रम:-

• आमच्या सामाजिक, आर्थिक प्राधान्यक्रमाला प्रतिसाद देणे.

• व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

• आपल्या समाजाचे संरक्षण

• आपल्या क्षेत्रात शांतता आणि एकोपा निर्माण करण्यासाठी मदत आणि

• क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अधिक मजबूतपणे उभे राहणे.

मित्रांनो,

राष्ट्रपती सीसी यांच्याशी बातचीत करताना बहुविध क्षेत्रात सहकार्य करण्याचे आम्ही मान्य केले आहे. आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी उभय देशांनी व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, हे आम्ही ओळखले आहे. त्यामुळेच वस्तू, सेवा आणि भांडवल यांच्यातील देवाणघेवाणीमुळेच दोन्ही अर्थव्यवस्थांना लाभ मिळणार आहे. याबरोबरच उभय देशांमध्ये सागरी वाहतूक क्षेत्रात सहकार्याचा करार करण्यात आला आहे. आपल्या देशातील खाजगी क्षेत्रातील व्यावसायिकांनीही एक नवीन व्यावसायिक भागीदार म्हणून याकडे पाहून सामंजस्य कराराचा लाभ घेतला पाहिजे. इतर विविध क्षेत्राबरोबरच कृषी, कौशल्य विकास, लघू आणि मध्यम उद्योग आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य करण्याचे करार इजिप्तशी करण्यात आले आहेत.

मित्रांनो,

वाढता जहालमतवाद-कट्टरता आणि पसरलेल्या दहशतवादामुळे होणारा हिंसाचार यांचा धोका केवळ आमच्या या दोन्ही देशांनाच आहे, असे नाही तर संपूर्ण जगाला आहे. यावर राष्ट्रपती सीसी आणि माझे एकमत आहे.

यासंदर्भात संरक्षण आणि सुरक्षा यांबाबत संयुक्त कारवाई करण्याचे आम्ही मान्य केले आहे.

• सुरक्षा व्यापार, प्रशिक्षण आणि क्षमतावृध्दी या क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याचा निर्णय.

• दहशतवादाविरुध्द लढा देण्यासाठी माहिती आणि कार्यात्मक देवाणघेवाण

• सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य, आणि

• अंमली पदार्थांची तस्करी, गुन्हे, पैशांचे अपहार याविषयी संयुक्तपणे कारवाई करणार

इजिप्त आणि भारत दोन्हीही अतिशय प्राचीन नागरी वसाहती आहेत. उभय देशांना प्राचीन सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यामुळे उभय देशांच्या जनतेमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणावर व्हावी, असे वाटते.

महोदय,

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा मंडळाच्या दृष्टीने इजिप्तने खूप चांगले कार्य केले आहे. त्याबद्दल भारताला इजिप्तचे कौतुक वाटते. संयुक्त राष्ट्र संघामध्ये आणि बाहेरही आपण अधिक जवळचे स्नेही बनले आहोत. क्षेत्रीय आणि वैश्विक प्रश्नांवर आपली भूमिका समान आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करण्याची दोन्ही राष्ट्रांची भूमिकाही समान आहे. पुढच्या सप्ताहात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेतील इजिप्तच्या सहभागाचे आम्ही स्वागत करतो. जी-20 शिखर परिषदेत अतिशय बहुमूल्य आणि महत्वपूर्ण चर्चा होईल, असा विश्वास आम्हाला वाटतो.

सन्माननीय राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी,

पुन्हा एकदा आपले आणि आपल्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाचे मी हार्दिक स्वागत करतो. आपल्याला आणि इजिप्तच्या जनतेला यश मिळावे, अशी इच्छा व्यक्त करतो. आपले विकासाचे आर्थिक विषयीचे आणि सुरक्षाविषयीचे उद्दीष्ट्य साध्य होण्यासाठी भारत एक विश्वासार्ह भागीदार म्हणून ठामपणे उभा राहण्यास सिध्द आहे.

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

B.Gokhle/S. Bedekar/V.Deokar