केंद्रीय अर्थसंकल्प 2022 च्या घोषणांची कार्यक्षम आणि जलद अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी, केन्द्र सरकार विविध प्रमुख क्षेत्रांमध्ये वेबिनारची मालिका आयोजित करत आहे.
या मालिकेचा एक भाग म्हणून, ऊर्जा मंत्रालयांचा समावेश असलेल्या संसाधनांवरील क्षेत्रीय गट; पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू; नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा; कोळसा; खाण; परराष्ट्र व्यवहार; आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल आदी सरकारने घेतलेल्या पुढाकाराच्या अनुषंगाने “शाश्वत वाढीसाठी ऊर्जा” या विषयावर 4 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता एका वेबिनारचे आयोजन केले आहे. अर्थसंकल्प 2022 मध्ये या संदर्भात घोषणा केल्या असून ऊर्जा आणि संसाधन क्षेत्रातील सरकारच्या पुढाकारांवर चर्चा करणे तसेच उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना जाणून घेण्यासाठी हे वेबिनार आयोजित केले आहे.
कॉप 26 मध्ये माननीय पंतप्रधानांनी सादर केलेल्या पंचामृत रणनीतीच्या अनुषंगाने, 2022 चा अर्थसंकल्प भारताच्या कमी-कार्बन विकास धोरणाचा प्रचार करून आपल्या ऊर्जा प्रवासातील परीवर्तन अधोरेखित करतो.
या अर्थसंकल्पात खाली नमूद केल्याप्रमाणे अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत:
शून्य जीवाश्म-इंधन धोरणासह इलेक्ट्रिक (ईव्ही) वाहने आणि विशेष मोबिलिटी झोनचा प्रचार
बॅटरी स्वॅपिंग धोरण आणि इंटर-ऑपरेबिलिटी मानके तयार करणे
‘बॅटरी किंवा ऊर्जेला एक सेवा म्हणून’ शाश्वत आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल विकसित करण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणे
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये थर्मल 5-7% बायोमास पेलेटचे सहज्वलन
कोळशाचे वायू आणि उद्योगासाठी आवश्यक असलेल्या रसायनांमध्ये रूपांतर करण्यासाठी चार पथदर्शी प्रकल्प उभारणे
हरित पायाभूत सुविधांसाठी संसाधने एकत्रित करण्यासाठी सार्वभौम हरित रोखे जारी करणे.
पायाभूत सुविधांच्या सुसंगत सूचीमध्ये चार्जिंग पायाभूत सुविधा आणि ग्रिड-स्केल बॅटरी यंत्रणेसह ऊर्जा संचयन प्रणालींचा समावेश.
इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी अमिश्रित इंधनासाठी अधिक कर.
वेबिनारमध्ये विविध विषयांवर सत्रे असतील आणि विविध मंत्रालये आणि राज्य सरकारांचे सरकारी अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि इतर तज्ञ सहभागी होतील.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्घाटन सत्राला संबोधित करतील. वेबिनारमध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे संकल्पना आधारित सहा समांतर सत्रांचा देखील समावेश असेल. सहयोगी प्रक्रियेचा एक भाग म्हणून, शाश्वत आर्थिक विकास साध्य करण्याच्या उद्देशाने 2022 च्या अर्थसंकल्पातील ऊर्जा आणि संसाधन क्षेत्रातील घोषणांसह महत्त्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सहभागी होणारे लक्ष्याधारित चर्चा करतील.
***
JPS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com