Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि इस्रायल दरम्यान अधिकृत राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 30 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांचे निवेदन

भारत आणि इस्रायल दरम्यान अधिकृत राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 30 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांचे निवेदन


 

दोन्ही देशांदरम्यान एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती. भले हा  अध्याय नवीन होतामात्र आपल्या दोन्ही देशांचा इतिहास खूप जुना आहे. आपल्या  लोकांमध्ये अनेक शतकांपासून घनिष्ट संबंध आहेत.

जसा भारताचा मूळ स्वभाव आहे, शेकडो वर्षांपासून आपला यहुदी समुदाय भारतीय समाजात कुठल्याही भेदभावाशिवाय , एका  सौहार्दपूर्ण वातावरणात राहिला आणि वाढला आहे. त्यांनी आपल्या विकास यात्रेत महत्वपूर्ण योगदान दिले आहे

आज जेव्हा जगात महत्वपूर्ण परिवर्तन होत आहेभारत-इस्रायल संबंधांचे  महत्त्व आणखी वाढले आहे. आणि परस्पर सहकार्यासाठी नवीन उद्दिष्ट ठरवण्याची याहून उत्तम संधी आणखी कोणती असू शकते. जेव्हा  भारत स्वातंत्र्याची  75 वर्षे साजरी करत आहे, जेव्हा इस्रायल आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पुढील वर्षी साजरी करेल  आणि जेव्हा दोन्ही देश आपल्या राजनैतिक  संबंधांची  30 वर्षे साजरी करत आहेत.

30 वर्षांच्या या  महत्वपूर्ण वळणावर, मी तुम्हा सर्वांचे पुन्हा अभिनंदन करतो. मला पूर्ण विश्वास आहे की भारत-इस्रायल मैत्री यापुढील दशकांमध्ये परस्पर सहकार्याचे नवे विक्रम प्रस्थापित करत राहील

धन्यवाद, तोदा रब्बा ।

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com