Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून केला घोषित


 

साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ या वर्षापासून 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवसम्हणून पाळला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पूरबचे पवित्र औचित्य साधून केली आहे.

ट्विटसच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

आज, श्रीगुरु गोविंद सिंगजींच्या प्रकाश पूरबच्या पवित्र दिवसानिमित्त, मला हे सांगताना गौरव वाटत आहे की या वर्षापासून, 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवसपाळला  जाईल. साहिबजादेंच्या न्यायासाठीच्या लढ्याला आणि  धैर्याला ही समर्पक श्रद्धांजली आहे.

साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांना भिंतीत जिवंत बंद करण्यात आल्यामुळे ज्या दिवशी हौतात्म्य प्राप्त झाले त्याच दिवशी वीर बाल दिवसअसेल. या दोन महात्म्यांनी धर्माच्या उदात्त तत्त्वांपासून विचलित होण्याऐवजी मृत्यूला प्राधान्य दिले.

माता गुजरी, श्री गुरु गोविंद सिंग आणि चार साहिबजादे यांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सलोखा असलेल्या जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती कळणे ही काळाची गरज आहे.

***

S.Tupe/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com