Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने, पंतप्रधान आणि फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीच्या चान्सलर डॉ. अँजेला मर्केल यांची भेट

G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने, पंतप्रधान आणि फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीच्या चान्सलर डॉ. अँजेला मर्केल यांची भेट


 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2021 रोजी रोम, इटली येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने  फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीच्या चॅन्सलर डॉ. अँजेला मर्केल यांची भेट घेतली.

त्यांच्यासोबतचे दीर्घकालीन सहकार्य आणि वैयक्तिक मैत्रीचे स्मरण करून,केवळ जर्मनीतच नव्हे तर युरोपीय आणि जागतिक स्तरावरील नेतृत्वासाठी पंतप्रधानांनी चान्सलर  मर्केल यांचे कौतुक केले. मर्केल यांच्या उत्तराधिकाऱ्यांसोबत दृढ धोरणात्मक भागीदारी कायम ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी वचनबद्धता दर्शवली.

उभय नेत्यांनी भारत आणि जर्मनी यांच्यातील दृढ  द्विपक्षीय सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच  व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्याचे वचन दिले.  हरित  हायड्रोजनसह नवीन क्षेत्रांमध्ये भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासही त्यांनी सहमती दर्शवली.

पंतप्रधानांनी डॉ मर्केल यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com