Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इटलीमधील  रोम येथे आयोजित जी -20 परिषदेच्या निमित्ताने, पंतप्रधान मोदी यांनी घेतली इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष  जोको विडोडो यांची भेट

इटलीमधील  रोम येथे आयोजित जी -20 परिषदेच्या निमित्ताने, पंतप्रधान मोदी यांनी घेतली इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष  जोको विडोडो यांची भेट


 

इटलीमधील  रोम येथे आयोजित जी –20 परिषदेच्या निमित्ताने , 31 ऑक्टोबर 2021 रोजी  पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी इटलीमध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष  श्री जोको विडोडो यांची भेट घेतली.

पुढील वर्षी होणाऱ्या G20 चे अध्यक्षपद इंडोनेशियाला मिळाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी इंडोनेशियाचे अभिनंदन केले.आणि ट्रोइकाचा भाग म्हणून इंडोनेशियासोबत  काम करण्याची भारताची तयारी असल्याचे आश्वासन दिले.

उभय नेत्यांनी भारत-इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या अलीकडील प्रगतीसंदर्भात चर्चा केली.उभय नेत्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात एकमेकांना दिलेल्या  दृढ पाठिंब्याची  प्रशंसा केली  आणि महामारी पश्चात पूर्वस्थितीत येण्यासाठी सहकार्य करण्याबाबत सहमती दर्शवली. त्यांनी इंडो-पॅसिफिक सहकार्याच्या महत्त्वावरही भर दिला.

उभय  देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक बळकट  करण्यासाठी आणि दोन्ही देशातील लोकांचा परस्परांशी संवाद वाढविण्यासाठी  दोन्ही नेत्यांनी वचनबद्धता दर्शवली.

हवामान बदलाविरोधात लढा देण्यासाठी , विशेषत: हवामानविषयक उपक्रमांना अर्थसाहाय्य करण्याच्या वचनबद्धतेच्या अंमलबजावणीच्या गरजेवरही चर्चा झाली.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com