Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची सिंगापूरच्या पंतप्रधानांसोबत बैठक

पंतप्रधानांची सिंगापूरच्या पंतप्रधानांसोबत बैठक


इटलीची राजधानी रोम इथं होत असलेल्या जी-20 शिखर परीषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंगापूरचे पंतप्रधान ली स्शेन हूंग यांच्याशी 30 ऑक्टोबर 2021 रोजी बैठक झाली. 

कोविड महामारीनंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. यावेळी उभय नेत्यांमध्ये हवामान बदलाच्या संकटाचे जगावर होणारे परिणाम आणि आगामी कोप 26 (COP26) विषयी चर्चा झाली. तसेच,लसीकरणाच्या प्रयत्नांना गती देऊन आणि महत्वाच्या औषधांचा पुरवठा सुनिश्चित करत कोविड महामारी कमी करण्याविषयीच्या सामायिक प्रयत्नांबद्दल देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. याच संदर्भात, पंतप्रधान मोदी यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सिंगापूरने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. सिंगापूरचे पंतप्रधान ली यांनी भारतातल्या वेगवान लसीकरण मोहिमेबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. 

यावेळी दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये नागरिकांमधील संबंध अधिक दृढ करण्यासह दोन्ही देशांमधील वाहतूक पूर्ववत आणण्यासाठीच्या प्रयत्नांवर देखील चर्चा झाली. 

*****

MC/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com