Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथला भेट व श्री आद्य शंकराचार्य समाधीचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन


नवी दिल्ली,  28 ऑक्टोबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिराला भेट देतील.

पंतप्रधान केदारनाथ मंदिरात प्रार्थना करतील. त्यानंतर ते श्री आद्य शंकराचार्य समाधीचे उद्‌घाटन करतील तसेच श्री आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरणही करतील. 2013 मध्ये आलेल्या पुराने नष्ट झालेल्या आदि शंकराचार्यांच्या समाधीची पुन्हा उभारणी करण्यात आली आहे. या पुनर्बांधणीचे काम पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रकल्पातील प्रगतीचा पंतप्रधान सातत्याने आढावा घेत होते तसेच त्यावर देखरेख करत होते. सरस्वती आस्थापथ येथे पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या कामाचाही पंतप्रधान आढावा घेतील.

पंतप्रधान सार्वजनिक सभेला संबोधित करतील. सरस्वती रिटेनिंग वॉल, आस्था पथ, आणि मंदाकिनी रिटेनिंग वॉल, आस्थापथ, तीर्थ पुरोहितांची घरे आणि मंदाकिनी नदीवरचा गरुड छत्ती पूल अशा अनेक पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा कामांचे उद्‌घाटन पंतप्रधान करतील.

ही प्रकल्प कामे पूर्ण करण्यासाठी 130 कोटींहून अधिक खर्च झाला आहे. संगम घाटाचा पुनर्विकास, प्रथमोपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, व्यवस्था कार्यालय आणि रुग्णालय, दोन अतिथीगृह, पोलीस स्टेशन, कमांड आणि कंट्रोल केंद्र, मंदाकिनी आस्थापथ रांग व्यवस्था, पावसासाठी संरक्षक, आणि सरस्वती नागरी सुविधा इमारत अशा अनेक पायाभूत सुविधा कामांचे पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होतील. या कामांसाठी 180 कोटींहून जास्त खर्च येणार आहे.

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com