Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसी नगरसेवकांची पंतप्रधान भेट

वाराणसी नगरसेवकांची पंतप्रधान भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी वाराणसीतील नगरसेवकांचे स्वागत केले.

पंतप्रधानांनी नगरसेवकांना पर्यटकांसाठी शहर अधिक आकर्षक बनवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या संबंधित वॉर्डांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांना प्रोत्साहित केले.

वाराणसी संसदीय मतदार संघामधील ग्राम प्रधान आणि नगरसेवकांबरोबर गेले पाच दिवस पंतप्रधानांनी साधलेल्या संवादामधील हा अखेरचा संवाद होता.

B.Gokhale/S. Kane/ D. Rane