नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे,जयपूर येथील सीआयपीईटी : इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी, या संस्थेचे उद्घाटन करणार आहेत तसेच राजस्थानच्या बांसवाडा, सिरोही, हनुमानगढ आणि दौसा जिल्ह्यांतील चार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणीही करणार आहेत.
या वैद्यकीय महाविद्यालयांना “जिल्हा/संदर्भ (रेफरल) रुग्णालयांशी संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना” या केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. अशी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी, आरोग्य सोयीसुविधा न मिळणाऱ्या, मागास आणि आकांक्षी जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाते. या योजनेच्या तीन टप्प्यांत देशभरात 157 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.
CIPET बद्दल:
राजस्थान सरकारसोबत, भारत सरकारने, CIPET : इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी, जयपूर संस्थेची स्थापना केली आहे. ही एक समर्पित आत्मनिर्भर संस्था असून पेट्रोकेमिकल्स आणि संबंधित उद्योगांच्या गरजा सक्षमपणे पूर्ण करण्यास समर्पित आहे. ही संस्था कुशल तांत्रिक व्यावसायिक होण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देईल.
या समारंभाला केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत देखील उपस्थित असतील.
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com